एनडी स्टुडिओच्या कर्मचाऱ्यांचं पुढे काय? सध्या कोणाच्या खांद्यावर आहे स्टुडिओची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 12:35 PM2023-08-09T12:35:20+5:302023-08-09T12:35:53+5:30

Nitin desai: नितीन देसाई यांनी २००४ मध्ये भव्यदिव्य अशा एनडीज आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सुरुवात केली होती.

after-art-director-nitin-desai-demise-what-will-be-the-future-of-nd-studio-who-will-handle-family-and-staff | एनडी स्टुडिओच्या कर्मचाऱ्यांचं पुढे काय? सध्या कोणाच्या खांद्यावर आहे स्टुडिओची जबाबदारी

एनडी स्टुडिओच्या कर्मचाऱ्यांचं पुढे काय? सध्या कोणाच्या खांद्यावर आहे स्टुडिओची जबाबदारी

googlenewsNext

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (nitin desai) यांनी २ ऑगस्ट रोजी त्यांच्या एनडी  स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही व्हॉइस नोट रेकॉर्ड केल्या होत्या. त्यानुसार, त्यांच्यावर काही जणांनी दबाव टाकल्याचं समोर आलं. त्यामुळेच सतत दबाव टाकून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी त्यांचे कुटुंबीय करत आहेत. यामध्येच आता त्यांच्या निधनानंतर एनडी स्टुडीओच्या स्टाफचं काय होणार?  असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नितीन देसाई आणि त्यांची पत्नी नेहा देसाई यांनी २००४ मध्ये भव्यदिव्य अशा एनडीज आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सुरुवात केली होती. हे दोघंही या कंपनीचे संचालक होते. मात्र, स्टुडिओचं काम नितीन स्वत: पाहायचे. त्यामुळे आता त्यांच्या निधनानंतर या स्टुडिओची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आली आहे. या स्टुडिओमध्ये ५० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. तसंच काही जण फ्रिलान्सर सुद्धा आहेत. त्यामुळे आता या कर्मचाऱ्याचं काय होणार हा प्रश्न पडला आहे. यामध्येच देसाई यांच्या जवळच्या व्यक्तीने TV9 हिंदीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी एनडी स्टुडिओच्या स्टाफचं काय होणार हे सांगितलं आहे.

नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर या स्टुडिओची जबाबदारी त्यांची पत्नी नेहा यांनी उचलली आहे. त्यांना या कामात त्यांची मुलगी मानसी सुद्धा मदत करत आहे. परंतु, जोपर्यंत एनडी स्टुडिओसंबंधित सुरु असलेलं कायदेशीर प्रकरण सोडवलं जात नाही. तोपर्यंत इथे शुटिंग करता येणार नाही.

Web Title: after-art-director-nitin-desai-demise-what-will-be-the-future-of-nd-studio-who-will-handle-family-and-staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.