बुद्धाच्या मूर्तीवर बसली आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप; अखेर मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 01:50 PM2019-06-19T13:50:24+5:302019-06-19T13:52:04+5:30

बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप गेल्या काही महिन्यांपासूनब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देतेय. या आजाराचा तिने धैर्याने सामना केला आणि ही लढाई जिंकली. पण सध्या ताहिरा एका फोटोमुळे ट्रोल होतेय.

after being trolled for sitting on a buddha statue tahira kashyap writes an apology | बुद्धाच्या मूर्तीवर बसली आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप; अखेर मागितली माफी

बुद्धाच्या मूर्तीवर बसली आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप; अखेर मागितली माफी

googlenewsNext
ठळक मुद्देआयुष्यमान ‘अंदाधुन’ या चित्रपटात बिझी असताना ताहिराला ब्रेस्ट कॅन्सरचे कॅन्सरचे निदान झाले होते.

बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप गेल्या काही महिन्यांपासूनब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देतेय. या आजाराचा तिने धैर्याने सामना केला आणि ही लढाई जिंकलीही. ताहिराने आपल्या आजाराबद्दल काहीही लपवले नाही.  केमोथेरपीने डोक्यावरचे केस गळले. पण ते लपवण्यासाठी ताहिराने खोटे केस लावले नाहीत तर थेट मुंडण केले,अगदी मुंडण केलेल्या अवतारात ती लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवरही उतरली. यानंतर ताहिराने काय करावे तर, आपल्या सर्जरीची जखम दाखवणारा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.  तिच्या या पोस्टचे बरेच कौतुक झाले. पण सध्या ताहिरा एका फोटोमुळे ट्रोल होतेय.


होय, सध्या ताहिरा कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेतेय. यादरम्यानचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर श्ेअर केले आहेत. यातल्याच एका फोटोत ताहिरा बुद्धाच्या मूर्तीवर बसलेली दिसली. ताहिराचे हे काम लोकांना आवडले नाही आणि ती चांगलीच ट्रोल झाली. सर्व धर्मांचा आदर करायला शिक, असे एका युजरने तिला सुनावले. अन्य एका युजरने तिला सुशिक्षित लोकांसारखा वागण्याचा सल्ला दिला. वाईट पद्धतीने ट्रोल झाल्यानंतर अखेर ताहिराला माफी मागावी लागली.


तिने एक पोस्ट लिहित, याबद्दल माफी मागितली. मी कुणाच्याही भावना दुखावू इच्छित नाही. अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल माफी मागते. तुम्हा सर्वांना खूप सारे प्रेम आणि सर्वांसाठी शांतीची कामना..., असे ताहिराने लिहिले. शिवाय संबंधित फोटोही डिलीट केला.


 ताहिरा एक प्रोफेसर आहे. शिवाय ‘टॉफी बिफोर’ नामक शॉर्ट फिल्म तिने दिग्दर्शित केली आहे. आयुष्यमान ‘अंदाधुन’ या चित्रपटात बिझी असताना ताहिराला ब्रेस्ट कॅन्सरचे कॅन्सरचे निदान झाले होते. ताहिराच्या या कठिण काळात आयुष्यमान कायम तिची सपोर्ट सिस्टिम बनून राहिला.

Web Title: after being trolled for sitting on a buddha statue tahira kashyap writes an apology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.