वडिलांच्या निधनानंतर ईशा केसकर लगेच गोव्याला गेल्यामुळे झाली होती ट्रोल, सोडले तिने मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 11:48 AM2020-12-21T11:48:26+5:302020-12-21T11:48:51+5:30

अभिनेत्री ईशा केसकरच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले.

After the death of her father, Isha Keskar went to Goa immediately and became a troll. She left in silence | वडिलांच्या निधनानंतर ईशा केसकर लगेच गोव्याला गेल्यामुळे झाली होती ट्रोल, सोडले तिने मौन

वडिलांच्या निधनानंतर ईशा केसकर लगेच गोव्याला गेल्यामुळे झाली होती ट्रोल, सोडले तिने मौन

googlenewsNext

मराठी अभिनेत्री ईशा केसकरच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ईशाने याबद्दलची माहिती दिली. मात्र वडिलांच्या निधनाच्या काही दिवसानंतर तिने गोव्याच्या समुद्र किनारी वेळ व्यतित करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तर काहींनी तिला ट्रोलदेखील केले. अखेर आता तिने यावरील चुप्पी तोडली आहे. तिने इंस्टाग्रामवर चाहत्यांशी गप्पा मारताना याबाबतचा खुलासा केला आहे. 


ईशाचे वडील चैतन्य केसकर यांनी २४ नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अनेकदा ईशा तिच्या वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायची. बाप लेकीमध्ये घट्ट बॉन्डींगही पाहायला मिळाले. वडिलांच्या निधनाच्या दहा दिवसांच्या आत ती गोव्याला गेल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेकांना तिने असे का केले असा प्रश्न पडला होता. अखेर तिने याबाबत खुलासा केला.


इंस्टाग्रामवर चाहत्यांशी गप्पा मारताना एका चाहत्याने तिला 'बाबांना जाऊन १० दिवस पण झाले नाहीत, तू फिरायला गेलीस. त्यांचे अंत्यसंस्कार कसे आणि कुठे केले? असे विचारले. त्यावर ईशा म्हणाली की, 'बाबा नास्तिक होता. त्याची इच्छा नव्हती की आम्ही सुतक, अंत्यसंस्कार करावे. उलट, त्याची समुद्र किनारी जायची शेवटची इच्छा राहिली होती.' 


ईशा केसकरमाझ्या नवऱ्याची बायको मालिकेत शनायाची भूमिका साकारत होती. मात्र काही दिवसानंतर तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाऊन काळात मालिकेचे शूटींग बंद होते. यानंतर तीन महिन्यानंतर मालिकेचे शूटींग सुरु झाले. याच काळात इशाच्या दाढेचे ऑपरेशन झाले. दाढेचे ऑपरेशन झाल्यामुळे दिलेल्या शूटिंगच्या तारखांना हजर राहणे तिला शक्य होणार नव्हती. तिच्यामुहे मालिकेचे चित्रीकरण लांबवणेही शक्य नव्हते. अखेर तिला मालिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. इशाने व्हिडीओ याची माहिती दिली आहे.

Web Title: After the death of her father, Isha Keskar went to Goa immediately and became a troll. She left in silence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.