वडिलांच्या निधनानंतर हिना खानवर कोसळला दु:खाचा डोंगर, आता शेअर केली आणखी एक वाईट बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 12:22 PM2021-04-27T12:22:19+5:302021-04-27T12:22:49+5:30

हिना खान वडिलांच्या निधनानंतर कोलमडून गेली आहे.

After the death of her father, a mountain of grief fell on Hina Khan, now shared another piece of bad news | वडिलांच्या निधनानंतर हिना खानवर कोसळला दु:खाचा डोंगर, आता शेअर केली आणखी एक वाईट बातमी

वडिलांच्या निधनानंतर हिना खानवर कोसळला दु:खाचा डोंगर, आता शेअर केली आणखी एक वाईट बातमी

googlenewsNext

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. या कोरोनाच्या विळख्यात सेलिब्रेटीही अडकताना दिसत आहेत. आता आणखी एक सेलिब्रेटीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही सेलिब्रेटी म्हणजे हिना खान. हिना वडिलांच्या निधनानंतर मुंबईत परतली होती. हिना खानने सोशल मीडियावर याबद्दल सांगितले आहे.


इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत हिना खानने सांगितले की ते प्रत्येक गोष्टींची काळजी घेते आहे आणि तिने कोणत्याही कठीण काळात सुरक्षित राहण्यासाठी सांगितले आहे. हिना खानने पोस्ट करत सांगितले की, मी आणि कुटुंबाच्या या कठीण काळात मी कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे आणि सर्व प्रकारची काळजी घेते आहे. मला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. सुरक्षित रहा आणि आपली काळजी घ्या.


हिना खानच्या वडीलांचे मागील आठवड्यात कार्डिअॅक अरेस्टने निधन झाले होते. वडिलांच्या निधनावेळी ती श्रीनगरमध्ये होती आणि तिला हे वृत्त कळताच ती मुंबईत परतली होती. तिने तिच्या कठीण काळात तिची आणि तिच्या कुटुंबाची साथ दिली त्या सर्व लोकांचे आभार मानले.


बॉलिवूडमध्ये बऱ्याच कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. या यादीत अक्षय कुमार, आलिया भट, रणबीर कपूर या कलाकारांचा समावेश आहे. 

Web Title: After the death of her father, a mountain of grief fell on Hina Khan, now shared another piece of bad news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.