अमृता सिंगला घटस्फोट दिल्यानंतर सैफला मोजावी लागली होती भली मोठी रक्कम, पोटगीच्या रूपात दिले इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 01:48 PM2020-12-28T13:48:55+5:302020-12-28T13:49:07+5:30
सैफच्या लग्नात त्या शुभेच्छा देण्यासाठी आली होती. त्यावेळी सैफला अंकल अंकल संबोधणारी हिच चिमुकली त्याच्याशी दुसरे लग्न करुन त्याची बेगम बनेल याची कल्पना त्यावेळी कुणीही केली नसेल.
बॉलीवुडचा छोटे नवाब सैफ अली खान याची दोन लग्न झाली आहेत.पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंग हिच्याशी झालं होतं. त्या लग्नावेळी सैफची दुसरी पत्नी करीना ही चिमुकली शाळकरी मुलगी होती.ती सैफच्या लग्नात त्या शुभेच्छा देण्यासाठी आली होती. त्यावेळी सैफला अंकल अंकल संबोधणारी हिच चिमुकली त्याच्याशी दुसरे लग्न करुन त्याची बेगम बनेल याची कल्पना त्यावेळी कुणीही केली नसेल.
3 महिन्यांच्या डेटनंतर सैफ आणि अमृताने 1991 मध्ये गुपचूप लग्न केले.या दोघांच्या वयामध्ये खुप अंतर होते. अमृता सैफपेक्षा जवळपास 12 वर्षे मोठी होती. दोघांनी सांगितले होते की, त्यांनी लग्नाच्या 2 महिन्यांपुर्वीच आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.
सैफ आणि अमृता त्यांच्या आयुष्यात प्रचंड खूश होते. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि लग्नाच्या 13 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचे ठरवले. 004 मध्ये ते दोघं वेगळे झाले. अमृता आणि सैफचे लग्न तुटण्यामागे सर्वात मोठे कारण इटालियन मॉडल रोजासोबत सैफचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जबाबदार असल्याचे बोलले गेले.
एका मुलाखतीत सैफने सांगितले की, घटस्फोद देते वेळी ५ कोटीं रुपये पोटगी अमृताला दिली जाणार असल्याचे निश्चित झाले होते. २.५ कोटी आधीच देण्यात आले होते. या व्यतिरिक्त मुलांच्या खर्चासाठी १ लाख दर महिना सैफला द्यावे लागतात.
अमृतापासून वेगळे झाल्यानंतर सैफेने वयाने त्याच्यापेक्षा 10 वर्षे लहान असलेल्या करीनासोबत 16 अक्टोबर 2012 मध्ये लग्न केले. दोघांचाही सुखी संसार सुरू आहे. लग्नाच्या काही वर्षात करिनाने तैमूरला जन्म दिला. तैमूनंतर आता दुस-यांदा करिना बाळाला जन्म देणार आहे. सध्या करिना प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे.
अशात सैफदेखील तिला काही त्रास होत नाही ना याची काळजी घेत असतो. खरंतर दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. सैफ करिनाची किती काळजी घेतो, हेही कुणापासून लपून राहिलेले नाही. त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.