'झुंड'नंतर नागराज मंजुळेंचा छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा येणार भेटीला, म्हणाले - 'हा चित्रपट रखडला असं...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 06:33 PM2022-03-11T18:33:23+5:302022-03-11T18:34:05+5:30

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत एका चित्रपटाची निर्मिती करत आहे.

After 'Jhund', Nagraj Manjule's movie on Chhatrapati Shivaji Maharaj will release, he said - 'This movie has stalled ...' | 'झुंड'नंतर नागराज मंजुळेंचा छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा येणार भेटीला, म्हणाले - 'हा चित्रपट रखडला असं...'

'झुंड'नंतर नागराज मंजुळेंचा छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा येणार भेटीला, म्हणाले - 'हा चित्रपट रखडला असं...'

googlenewsNext

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund Movie) हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान दिग्दर्शक नागराज मंजुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट बनवणार आहेत.या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला होता. मात्र कोरोनामुळे या चित्रपटाची निर्मिती करण्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती नागराज मंजुळेंनी नुकतीच दिली आहे.

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) दोघे मिळून शिवरायांच्या आयुष्यावरील चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर नागराज मंजुळे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. दोन वर्षांपूर्वी या चित्रपटाचा टीझरही रिलीज झाला होता. तेव्हापासून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. 

नागराज मंजुळे यांनी नुकतेच पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “कोरोनामुळे आमचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. त्यात आम्हाला दोन वर्षे गमवावी लागली. ज्यामुळे आम्हाला नैसर्गिकरित्या या चित्रपटाचे काम करता आले नाही. पण हा चित्रपट रखडला असे आपण बोलू शकत नाही.हा एक अत्यंत उत्कृष्ट प्रकल्प आहे. या चित्रपटाबद्दल तुमच्याइतकाच मी देखील खूप उत्सुक आहे आणि याबाबत सर्व काही व्यवस्थित झाले की तुम्हाला याची माहिती देईन. 
ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटाची निर्मिती करणे हे आव्हानात्मक आहे. हा चित्रपट ऐतिहासिक आहे. पण शेवटी आम्ही एका चित्रपटाची निर्मिती करत आहोत आणि चित्रपटाच्या निर्मितीचे नियम बदलत नाही. फक्त विषय बदलतात आणि अर्थातच चित्रपटाच्या स्वरुपात एक आव्हान समोर येतं. मी जेव्हा लहान होतो तेव्हाही छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट किती छान होईल, याचा विचार करायचो. मी त्यांच्यावर निर्मित झालेले दोन चित्रपट पाहिले आणि आता मला ते स्वत: बनवायचे आहेत. त्यामुळे माझ्यासाठी हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे.
अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटाची निर्मिती करत आहे. ‘शिवत्रयी’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. तर या भव्य अशा चित्रपटाला संगीत अजय-अतुल देणार आहेत. 

Web Title: After 'Jhund', Nagraj Manjule's movie on Chhatrapati Shivaji Maharaj will release, he said - 'This movie has stalled ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.