कंगनानंतर शर्लिन चोप्राने साधला दीपिका पादुकोणवर निशाणा, म्हणाली-करून देतात डिप्रेशनचे नारा
By गीतांजली | Published: October 13, 2020 01:07 PM2020-10-13T13:07:59+5:302020-10-13T13:41:08+5:30
अभिनेत्री शर्लिन चोप्रासुद्धा कंगनाच्या सपोर्टमध्ये पुढे आली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौवतने ड्रग्स प्रकरणी अनेकवेळा फिल्म इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे. आता अभिनेत्री शर्लिन चोप्रासुद्धा कंगनाच्या सपोर्टमध्ये पुढे आली आहे. याआधी शर्लिनने क्रिकेटर्स आणि बॉलिवूड अभिनेत्यांच्या पत्नी ड्रग्ज घेतल्याबद्दलचा खुलासा केला होता.
कंगनाने वर्ल्ड मेंटल हेल्थ डे च्या दिवशी आपला सिनेमा जजमेंटलला प्रमोट केले होते. यावेळी कंगनाने सोशल मीडियावर नाव घेता दीपिका पादुकोणवर निशाना साधला आहे. आता कंगनाच्या सपोर्टमध्ये शार्लिन चोप्रा उतरली आहे.
आपल्या ट्विटमध्ये कंगनाने लिहिले होते की, 'मेंटल हेल्थ अवेअरनेससाठी आम्ही जो सिनेमा बनवला होता, त्याला त्या लोकांनी कोर्टात खेचलं जे डिप्रेशनचं दुकान चालवतात. मीडिया बॅननंतर सिनेमाचं नाव बदलण्यात आलं. ज्यामुळे या सिनेमाच्या मार्केटींगवर प्रभाव पडला. पण हा एक चांगला सिनेमा आहे आणि तो आजच बघा.
कंगना जी,सहीं कहा आपने,ये लोग माल फूँक के डिप्रेशन के नारे लगाते हैं और देश की युवा पीढ़ी को अंधकार में ढकेलते हैं।
— Sherni (@SherlynChopra) October 10, 2020
दो वक़्त की रोटी कमाने के लिए जो मज़दूर सुबह शाम मज़दूरी करता है,क्या उसे डिप्रेशन नहीं होती है?
क्या डिप्रेशन से राहत पाने के लिए हम माल का सेवन करना शुरू कर दें? https://t.co/Iu25pHDRvK
कंगनाच्या ट्विटला रिट्वीट करत शर्लिन चोप्रा म्हणाली, “कंगना तू अगदी योग्य म्हणालीस.नशा करत डिप्रेशनचे नारे लावतात आणि युवा पिढीला अंधःकारात ढकलतात. दोन वेळची भाकरी मिळवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या मजुराला डिप्रेशन नसतं का? नैराश्येतून बाहेर पडण्यासाठी ड्रग्जचं सेवन करावं का?”
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगलसमोर आल्यानंतर दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंगची एनसीबीने चौकशी केली होती.