'लाल सिंग चड्ढा'नंतर आमिर खान लागणार 'मुगल' या बहुप्रतिक्षित बायोपिकच्या तयारीला
By गीतांजली | Published: November 6, 2020 04:15 PM2020-11-06T16:15:12+5:302020-11-06T16:34:55+5:30
आमिर खान 'लालसिंग चड्ढा'चे काम पूर्ण करताच तो या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात करणार आहे
टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या बायोपिकची तयारी सुरू झाली आहे. गुलशन कुमार यांचा मुलगा भूषणनुसार, आमिर खान 'लालसिंग चड्ढा' नंतर या सिनेमाच्या शूटींगला सुरुवात करेल. यासह हे देखील स्पष्ट झाले आहे की निर्माता दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या बहुप्रतिक्षित 'विक्रम वेध' चा रिमेक लगेच सुरू होणार नाही.
भूषण म्हणाला, की कोरोनामुळे गडबड झाली. आता आमिर खान 'लालसिंग चड्ढा'चे काम पूर्ण करताच तो या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात करणार आहे. हा चित्रपट प्रत्येकासाठी खूप खास आहे. यासाठी प्रत्येकजण खूप उत्सुक आहे.
सुरुवातीला जेव्हा चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा अभिनेता अक्षय कुमार 'मुगल' चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार होता. नंतर हा चित्रपट आमिर खानकडे आला. पण त्यावेळी 'मुगल' चित्रपटाचे दिग्दर्शन करणार्या सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झाला तेव्हा आमिरने त्याचे नाव मागे घेतले. त्यानंतर संपूर्ण प्रकरण संशयास्पद वाटले आणि आमिर म्हणाला की जोपर्यंत आरोपीला गुन्हेगार घोषित केले जात नाही तोपर्यंत तो निर्दोष आहे. यानंतर, आमिरने या चित्रपटात पुनरागमन केले. आमीर खान सध्या आपल्या 'लालसिंग चड्ढा' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करीत आहे.
यासह हे देखील स्पष्ट झाले आहे की निर्माता दिग्दर्शक नीरज पांडे यांचा बहुप्रतिक्षित 'विक्रम वेध' चा रिमेक नुकताच सुरू होणार नाही. 'विक्रम वेधा' चित्रपटाच्या रिमेकचे हक्क नीरज पांडे यांच्या कंपनीकडे आहेत. आमिर खानलाही हा चित्रपट आवडला आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेसाठी उत्सुक आहे, जो मूळ चित्रपटात अभिनेता विजय सेठपतिने केला होता.