अनेक अडथळ्यानंतर महाअक्षय आणि मदालसा अडकले लग्नाच्याबेडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 04:21 PM2018-07-10T16:21:57+5:302018-07-10T16:35:30+5:30
मिथुन चक्रवर्ती आणि योगिता बाली यांचा मुलगा महाअक्षय आज अखेर लग्नाच्या बेडीत अडकला आहे. शीला शर्मा यांची मुलगी मदालसा शर्मासोबत महाअक्षयचे लग्न झाले आहे.
मिथुन चक्रवर्ती आणि योगिता बाली यांचा मुलगा महाअक्षय आज अखेर लग्नाच्या बेडीत अडकला आहे. ‘यस बॉस’, ‘नदिया के पार’ फेम अभिनेत्री शीला शर्मा यांची मुलगी मदालसा शर्मासोबत महाअक्षयचे लग्न झाले आहे. एका भोजपुरी अभिनेत्रीने महाअक्षयवर बलात्कार, फसवणूक व गर्भपात करण्यास सक्ती केल्याचा आरोप ठेवला आहे. महाअक्षयची आई योगिता बाली यांच्यावरही पीडितेने धमकावल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हे लग्न होईल की नाही असा प्रश्न पडला होता.
महाअक्षय आणि मदालसा शर्मा हिने 7 जुलैलाच लग्न केल्याची माहिती मिळतेय. ठरलेल्या तारखेलाच दोघांनी लग्न केले आहे. बॉम्बे टाईम्सच्या रिपोर्टनुसार पोलिस तापासामुळे पारंपारिक पद्धतीने होणार लग्न कॅन्सल करण्यात आले. गत आठवड्यात महाअक्षय आणि योगिता यांची बेल मुंबई हायकोर्टाने फेटाळली होती. दरम्यान महाअक्षयने दिल्लीच्या रोहिणी कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. त्यानुसार, रोहिणी कोर्टाने महाअक्षयला अंतरिम जामीन मंजूर केला.7 जुलैला महाअक्षयला जामिन मंजूर झाल्यानंतर कुटुंबीयांनी एक छोटसे सेलिब्रेशन केले आणि रजिस्टर्ड मॅरेज ही करण्यात आले.
संबंधित पीडित भोजपुरी अभिनेत्रीने महाअक्षयवर बलात्काराचा आरोप केला आहे. तिने तक्रारीत म्हटले आहे की, मी एप्रिल २०१५मध्ये महाअक्षयला भेटले. मे २०१५ मध्ये त्याने मला नशा देऊन माझ्यावर बलात्कार केला. पुढेही मी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहिले. कारण त्याने मला लग्नाचे वचन दिले होते. पण मी प्रेग्नंट राहिल्यावर त्याने माझ्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणला. मिथुनची पत्नी व महाअक्षयची आई योगिता बाली हिनेही आपल्याला धमकावले.