महादेव बेटिंग अॅप प्रकरण; रणबीर कपूरनंतर कपिल शर्मा आणि हुमा कुरेशीला EDचे समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 08:51 PM2023-10-05T20:51:47+5:302023-10-05T20:52:08+5:30
महादेव बेटिंग अॅप प्रकरणात रणबीर कपूरनंतर आणखी तिघांना समन्स बजावण्यात आले आहे.
महादेव बेटिंग अॅप प्रकरणात रणबीर कपूरनंतर आता आणखी काही कलाकारांची नावे समोर आली आहेत. याप्रकरणी ED ने रणबीर कपूरला समन्स बजावले आहे. त्यानंतर आता आणखी काही स्टार्सनाही ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि हिना खान, यांना ईडीने समन्स बजावले आहे.
ED has summoned comedian Kapil Sharma and actor Huma Qureshi in connection with the Mahadev betting app case: ED Sources
— ANI (@ANI) October 5, 2023
(file pics) pic.twitter.com/rKXxUgtucl
4 ऑक्टोबर रोजी रणबीर कपूरला ईडीने समन्स बजावल्याची बातमी समोर आली होती. आता ईडीने कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खान यांनाही समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. सनी लिओन, कृष्णा अभिषेक, पुलकित सम्राट यांच्यासह 14 स्टार्स ईडीच्या रडारवर असल्याची माहिती यापूर्वीही आली होती. महादेव बेटिंग अॅप प्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकरच्या लग्नाला हे सर्व स्टार्स हजर होते. कपिल, हुमा आणि हिना यांची नावे त्या 14 स्टार्समध्ये नसली तरी, आता तिघांनाही समन्स बजावण्यात आले आहे.
Actor Ranbir Kapoor summoned by Enforcement Directorate on 6th October, in connection with Mahadev betting app case
— ANI (@ANI) October 4, 2023
(file photo) pic.twitter.com/K8DZhME5RK
रणबीरने दोन आठवड्यांचा वेळ मागितला
रणबीर कपूरला 6 ऑक्टोबर रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. त्याला ईडीच्या रायपूर शाखेत हजर व्हावे लागणार आहे. मात्र, रिपोर्टनुसार रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. आता या प्रकरणात कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खान यांचीही नावे जोडली गेली आहेत.