सायना नेहवालनंतर ह्या महिला खेळाडूवर बनणार बायोपिक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 01:29 PM2018-08-03T13:29:13+5:302018-08-03T19:00:00+5:30

निर्माता रॉनी स्क्रूवाला हे भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झावर चित्रपट बनवणार आहे.

After Saina Nehwal, the female player will become biopic | सायना नेहवालनंतर ह्या महिला खेळाडूवर बनणार बायोपिक

सायना नेहवालनंतर ह्या महिला खेळाडूवर बनणार बायोपिक

googlenewsNext
ठळक मुद्देसानियावर आधारित चित्रपट बनविण्याचे राइट्स रॉनी स्क्रूवाला यांनी विकत घेतले आहेतसानिया मिर्झाचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर

बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड असून एका पाठोपाठ एक बायोपिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या बायोपिकमध्ये काही चित्रपट हे खेळाडूंवर आधारीत होते. महिला बॉक्सर मेरी कॉमवरील चित्रपट मेरी कॉम, क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीवर आधारित बायोपिक एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी नंतर भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंह यांच्यावर आधारित सूरमा हा चित्रपट प्रदर्शित झाला. याशिवाय श्रद्धा कपूर ही बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, तर हर्षवर्धन कपूर हा नेमबान अभिनव बिंद्रा यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यानंतर आता निर्माता रॉनी स्क्रूवाला हे भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यावर चित्रपट बनवणार आहे.

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती करण्यासाठी अनेक जण प्रयत्नात होते. मात्र, सानियावर आधारित चित्रपट बनविण्याचे अधिकार रॉनी स्क्रूवाला यांनी विकत घेतले आहेत. यात सानियाच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्याबद्‌दलची माहिती दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी लवकरच दिर्ग्दशकाची निवड करण्यात येणार असून त्यानंतर कास्टिंग होणार आहे. सानिया मिर्झाची भूमिका कोण साकारणार, हे जाणून घ्यायला तिचे चाहते खूप उत्सुक आहे.
सानियाचा जन्म मुंबईत झाला होता. परंतु जन्मानंतर ती आई-वडिलांसह हैदराबाद गेली. सानियाने ६ व्या वर्षीच टेनिस खेळण्यास सुरूवात केली होती. तिने २००३मध्ये दुहेरी विम्बलडनचा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने ६ ग्रॅण्ड स्लॅम किताब जिंकले. तिने केलेल्या या कामगिरीची दखल घेत भारत सरकारने सानियाला पद्मश्री, पद्म भूषण, राजीव गांधी खेल रत्न आणि अर्जुन आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. २०१० साली तिने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केले. त्यानंतर तिच्यावर खूप टीका झाली होती. सानिया मिर्झाचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. 
 

 

Web Title: After Saina Nehwal, the female player will become biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.