सोनू सूदनंतर आता ‘सिंघम’ अवतारात मैदानात उतरला अजय देवगण, धारावीतील 700 कुटुंबाची घेतली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 02:28 PM2020-05-28T14:28:29+5:302020-05-28T14:29:13+5:30
आला रे आला,‘सिंघम’आला!! कोरोनाचे केंद्र बनलेल्या धारावीला अजय देवगणची साथ
कोरोना काळात मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत. बॉलिवूड स्टार्सही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सनी आर्थिक दान व गरजूंसाठी भोजनाची व्यवस्था केली. पण आता स्टार्स गरजंूच्या मदतीसाठी थेट मैदानात उतरत आहेत. सोनू सूदने स्थलांतरीत मजुरांसाठी बस सेवा सुरु केली. आता सोनूपाठोपाठ बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगण धारावीतील 700 कुटुंबाच्या मदतीसाठी समोर आला आहे. अजयने ट्विट करत ही माहिती दिली आहे. शिवाय लोकांनाही या कामी मदत करण्याचे आवाहन केले आहे.
Dharavi is at the epicentre of the Covid19 outbreak.Many citizens supported by MCGM are working tirelessly on ground through NGOs to provide the needy with ration & hygiene kits. We at ADFF are helping 700 families.I urge you to also donatehttps://t.co/t4YVrIHg3M#MissionDharavi
— Ajay Devgn (@ajaydevgn) May 27, 2020
‘धारावी कोव्हिडी 19चे मुख्य केंद्र बनले आहे. अनेक लोक एमसीजीएमच्या मदतीने दिवसरात्र काम करत आहेत. अनेक एनजीओ धारावीतील गरजूंना राशन व हायजीन किट्सचे वाटप करत आहे. आम्ही 700 कुटुंबाना मदत करत आहोत. तुम्हीही यात योगदान देऊ शकता,’ असे ट्विट अजय देवगणने केले आहे.
Tanhaji.. Aap bhi kr lo kuch aisa..!... Kab tk ghar me rahoge. 🙏
— Vishal. (@Vishall_Tyagi) May 26, 2020
गेल्या काही दिवसांत धारावीत कोरोनातील केसेस प्रचंड वाढत आहेत. आत्तापर्यंत येथील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दीड हजारापार गेली आहे.
नुकतेच अजय देवगणने सोनू सूदच्या कामाचे कौतुक केले होते. मजुरांना सुरक्षित घरी पोहोचवण्याचे जे संवेदनशील काम तू करतो आहेत, ते कौतुकास्पद आहे.तुला आणखी हिंमत मिळो, सोनू, असे ट्विट अजयने केले होते. अर्थात यावरून तो ट्रोलही झाला होता. सोनूचे कौतुक केले ते चांगलेच. पण तुझ्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत, असे अनेकांनी अजयला सुनावले होते. तू सुद्धा रिअल लाईफ सिंघम बनू शकतोय. एकदा प्रयत्न तर करून पाहा, असा सल्ला एका युजरने त्याला दिला होता.