श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांच्या काकांनी केले होते धक्कादायक खुलासे, म्हणाले- आतून ती प्रचंड दु:खात होती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 04:22 PM2021-02-24T16:22:34+5:302021-02-24T16:33:45+5:30
Sridevi's death anniversary : आजही श्रीदेवींच्या आठवणीने चाहते भावूक होतात.
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी 24 फेब्रुवारी 2018 रोजी जगाचा निरोप घेतला होता. त्यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांचा धक्का बसला होता. आजही श्रीदेवींच्या आठवणीने चाहते भावूक होतात. आज श्रीदेवींच्या स्मृतीदिनी जान्हवी कपूरने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. श्रीदेवींनी आपल्या हातांनी लिहिलेली नोट जान्हवीने शेअर केली आहे. श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांचे काका वेणुगोपाल रेड्डी यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले होते.
1996 साली बोनी कपूर श्रीदेवी यांच्यासोबत विवाह बंधनात अडकले होते. 2018 साली श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांनी बोनी कपूर यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईत गेल्या होत्या. एक फाईव्ह हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून त्यांच्या मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे काका वेणुगोपाल यांनी अनेक खुलासे केले होते.
वेणुगोपाल रेड्डी यांनी एका तेलगू न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत श्रीदेवींच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते.. श्रीदेवींच्या आयुष्यात प्रचंड दु:ख होते, असा दावा त्यांनी यावेळी केला होता. ‘श्रीदेवी सगळ्यांसमोर हसत राहायची. पण आतून त्या प्रचंड दु:खात होती. हेच दु:ख आणि अपार वेदना घेऊन त्या या जगातून गेली. श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांचा बराच पैसा चित्रपट न चालल्याने डुबला होता.
हा तोटा भरून काढण्यासाठी आणि नवा पैसा उभा करण्यासाठी बोनी कपूर यांनी श्रीदेवीची बरीच प्रॉपर्टी विकली. प्रॉपर्टी विकली गेल्याने आणि आर्थिक स्थिती ठीक नसल्याने श्रीदेवी कायम चिंतीत असायची. असा खुलासा त्यांनी त्यावेळी दिलेल्या एका मुलाखती दरम्यान केला होता.