श्रीदेवीच्या निधनाचा करण जोहरलाही बसला होता 'सदमा', घेतला होता मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 04:45 PM2020-02-24T16:45:07+5:302020-02-24T16:51:23+5:30
श्रीदेवीची रुपेरी पडद्यावरील अखेरची झलक आनंद एल. राय यांच्या झीरो या सिनेमात पाहायला मिळाली.
बॉलीवुडची चांदनी अभिनेत्री श्रीदेवीच्या अकाली निधनाने सा-यांनाच मोठा धक्का बसला होता. बोनी कपूर यांच्या भाच्याच्या दुबईला लग्नासाठी गेलेल्या श्रीदेवीचा हॉटेलच्या बाथरुमधील बाथटबमध्ये पडून मृत्यू झाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीची रुप की रानी आणि पहिली महिला सुपरस्टार असणा-या श्रीदेवीची ही एक्झिट चटका लावून जाणारी होती. श्रीदेवीची रुपेरी पडद्यावरील अखेरची झलक आनंद एल. राय यांच्या 'झीरो' या सिनेमात पाहायला मिळाली.
या सिनेमात श्रीदेवीसह किंग खान शाहरुख, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. श्रीदेवीच्या निधनामुळे प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरलाही जबर धक्का बसला होता. त्यामुळेच याचा परिणाम करणच्या सिनेमावरही दिसून येत आहे. करणने त्याच्या आगामी शिद्दत या सिनेमाचं शुटिंग अनिश्चित काळासाठी थांबवलं होतं. करण जोहरचा शिद्दत हा सिनेमा त्याच्या महत्त्वाकांक्षी सिनेमांपैकी एक मानला जात होता.
The unpredictability of life only hits us in times of tragedy ...then soon after we go back to being petulant and full of ourselves....I hope we can take stock of the eventualities of life and death and then rise above our own insecurities....
— Karan Johar (@karanjohar) February 26, 2018
'शिद्दत' या सिनेमात अभिनेत्री श्रीदेवी झळकणार होत्या. तसंच या सिनेमाच्या निमित्ताने श्रीदेवी आणि संजय दत्त ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार होती. याआधी गुमराह सिनेमात श्रीदेवी आणि संजय दत्त यांनी एकत्र भूमिका साकारली होती. करणच्या शिद्दत या सिनेमाच्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आणण्याचे करणनं ठरवलं होते. याशिवाय या सिनेमात आलिया भट्टसुद्धा झळकणार होती. मात्र करणने हा सिनेमा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला.
करण जोहर हा श्रीदेवी आणि कपूर कुटुंबीयांचा निकटवर्तीय मानला जातो. कपूर कुटुंबीयांशी करणचे चांगले संबंध आहेत. श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी येताच जान्हवी आणि खुशी यांना धीर देण्यासाठी पोहचणा-यांमध्ये करण आघाडीवर होता. याशिवाय दुबईत मोहित मारवाच्या लग्नातसुद्धा करण श्रीदेवीसह थिरकतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यामुळे श्रीदेवी यांच्या निधनामुळे करणला धक्का बसणं स्वाभाविक होते.