सूरज कॅप्टन होताच जान्हवीचा संताप अनावर, संपूर्ण घराला विचारला जाब! म्हणाली- 'मला कॅप्टनसी हवीय'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 05:21 PM2024-09-06T17:21:44+5:302024-09-06T17:24:15+5:30

सूरजला घरात कॅप्टनसीपदाचा बहुमान मिळाल्यावर जान्हवीचा संताप अनावर झालाय (jahnavi killekar)

after suraj chavan elected captain of bigg boss marathi 5 jahnavi killekar become angry | सूरज कॅप्टन होताच जान्हवीचा संताप अनावर, संपूर्ण घराला विचारला जाब! म्हणाली- 'मला कॅप्टनसी हवीय'

सूरज कॅप्टन होताच जान्हवीचा संताप अनावर, संपूर्ण घराला विचारला जाब! म्हणाली- 'मला कॅप्टनसी हवीय'

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आज मोठा राडा होणार आहे. आज कॅप्टनसी लढतीसाठी सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर हे चौघे कॅप्टनपदाचे उमेदवार होते. यापैकी सूरज चव्हाण घराचा नवीन कॅप्टन झाला आहे. परंतु सूरज कॅप्टन होणं जान्हवीला तितकंसं आवडलेलं दिसत नाहीय. तिने संपूर्ण घराला जाब विचारत ती कॅप्टन होण्यास का लायक नाही, असं विचारलंय.

जान्हवीने सर्वांना जाब विचारत व्यक्त केला राग

जान्हवी किल्लेकरचा नवीन प्रोमो समोर आलाय. यात ती पोटतिडीकीने घरच्यांशी बोलताना दिसतेय. घरच्यांनी कॅप्टन म्हणून सूरजची निवड केली हे जान्हवीला अजिबात आवडलेलं दिसत नाहीय. जान्हवी सूरजकडे बोट दाखवत म्हणाली, "हा का capable आहे कॅप्टनसीसाठी मला आताच्या आता जाणून घ्यायचंय. मनापासून सांगा मी लायक नाहीय का कॅप्टनसीसाठी? जे लोक सुधरण्याचा प्रयत्न करत आहेत ना, त्यांना तुम्ही म्हणताय तुम्ही सुधारलात तरी काहीही फायदा नाहीय. आम्ही तुमच्याशी तसंच वागणार" असं म्हणत जान्हवीच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसलं.



सूरज चव्हाण झाला नवीन कॅप्टन

आज घरातील सर्व सदस्य एकमुखाने आमचा कॅप्टन म्हणजे सूरज असं म्हणताना दिसत आहेत. सूरज कॅप्टन झाल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी चांगलीच धमाल केली आहे. “हमारा कॅप्टन कैसा हो सूरज जैसा हो” अशी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच सर्व सदस्यांनी मिळून सूरजबरोबर ‘झापुक झुपूक’ डान्स देखील केला.'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये आतापर्यंत अंकिता वालावलकर, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर कॅप्टन झाले आहेत. तर आता सहाव्या आठवड्यात गोलीगत सूरज चव्हाणला कॅप्टन पदाचा मान मिळाला आहे. कॅप्टन रूमचा ताबा घेण्याआधी सूरजने हात जोडून नमस्कार केलेला पाहायला मिळाला.

Web Title: after suraj chavan elected captain of bigg boss marathi 5 jahnavi killekar become angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.