RRRच्या रिलीजनंतर आलिया भट राजामौलींवर झाली नाराज?, यावर आता अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 06:48 PM2022-03-31T18:48:01+5:302022-03-31T18:49:05+5:30
Alia Bhatt on Upset With SS Rajamouli: काही दिवसांपूर्वी असे वृत्त समोर आले होते की 'आरआरआर' (RRR) रिलीज झाल्यानंतर आलिया भट दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्यावर नाराज झाली होती. मात्र या वृत्तांवर अखेर आलिया भटने चुप्पी तोडली आहे.
सध्या दिग्दर्शक एस एस राजामौली (SS Rajamouli) यांचा 'आरआरआर' (RRR Movie) चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतो आहे. या चित्रपटाने आतापर्यंत यशाचे अनेक विक्रम केले आहेत, तर हा ट्रेंड सातत्याने सुरू राहण्याची आशा आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट(Alia Bhatt)नेही या चित्रपटाद्वारे साउथ इंडस्ट्रीत दमदार पदार्पण केले आहे. मात्र, चित्रपट रिलीज झाल्यानंतर आलिया भट चित्रपट निर्माते राजामौली यांच्यावर नाराज असल्याची बातमी आली होती. या चित्रपटासंबंधीच्या सर्व पोस्ट तिने डिलीट केल्या आहेत. मात्र आता आलिया भटनेच सोशल मीडियावर या बातम्यांवर मौन तोडले आहे.
आलिया भटने इंस्टाग्राम स्टोरीवर एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले की, 'आज अनेक गोष्टी ऐकल्या की मी माझ्या 'RRR' पोस्ट डिलीट केल्या आहेत कारण मी टीमवर नाराज आहे. मी प्रामाणिकपणे फक्त एवढीच विनंती करू शकते की इंस्टाग्राम ग्रिड सारख्या गोष्टीवर आधारित गृहितक करणे चुकीचे आहे. मी नेहमी माझ्या प्रोफाइल ग्रिडवरून जुने व्हिडिओ पोस्ट बदलते कारण ते निरुपयोगी दिसू नये. मला 'RRR'च्या जगाचा भाग बनण्याची संधी मिळाली याबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे. मला सीतेची भूमिका करायला आवडली होती, मला राजामौली सरांच्या दिग्दर्शनाखाली काम करायला आवडले. तारक आणि चरणसोबत काम करताना मला खूप मजा आली. मला या चित्रपटाचा चांगला अनुभव आला आणि मला सर्व काही आवडले.
आलिया भट इथेच थांबली नाही तर तिने पुढे लिहिले की, 'मी ही बातमी क्लिअर करत आहे कारण एसएस राजामौली सर आणि चित्रपटाच्या टीमने अनेक वर्षे मेहनत केली आहे. मला चित्रपटाशी संबंधित कोणतीही खोटी बातमी पसरवायची नाही.
यामुळे चर्चेला आले उधाण
या चित्रपटात आलिया भटने राम चरणच्या फियॉन्से सीतेची भूमिका साकारली होती. चित्रपट पाहिल्यानंतर आलियाच्या चाहत्यांना असे वाटले की आलिया भटचा 'RRR' चित्रपटातील स्क्रीन टाइम खूपच कमी आहे. त्यानंतर असे झाले की आलिया भटनेही 'RRR' चित्रपटाशी संबंधित काही सोशल मीडिया पोस्ट आणि प्रमोशनल पोस्ट डिलीट केल्या. यानंतर आलिया आणि राजामौलीमध्ये सर्व काही ठीक नसल्याची बातमी समोर आली. आलिया चित्रपट निर्मात्यावर नाराज आहे, अशी सगळीकडे चर्चा रंगली होती. मात्र आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून या चर्चेला पूर्णविराम लावला आहे.