दोन संसार थाटल्यानंतर धर्मेंद्र पडले होते टीव्ही अभिनेत्रीच्या प्रेमात; हेमा मालिनीला कळलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 11:31 AM2024-06-03T11:31:49+5:302024-06-03T11:32:37+5:30
Dharmendra: हेमा मालिनीसोबत लग्न केल्यानंतरही धर्मेंद्र एका टीव्ही अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते.
बॉलिवूडचा हिमॅन या नावाने तुफान लोकप्रियता मिळवणाऱ्या धर्मंद्र (dharmendra) यांनी इंडस्ट्रीचा एक काळ गाजवला आह. १९६० मध्ये इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या धर्मंद्र यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. आपल्या दमदार अभिनयामुळे चर्चेत येणारे धर्मेंद्र त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहिले. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत (hema malini) दुसरा संसार थाटला. मात्र, हेमा मालिनीसोबत लग्न केल्यानंतरही ते एका टीव्ही अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते, असं म्हटलं जातं.
वयाच्या १९ व्या वर्षी प्रकाशकौर सोबत केलं पहिलं लग्न
धर्मेंद्र यांचं वयाच्या १९ व्या वर्षी पहिलं लग्न झालं. त्यांनी १९५४ साली प्रकाशकौर यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना ४ मुलंदेखील झाली. यात बॉबी आणि सनी देओल हे कलाविश्वात सक्रीय आहे. तर, अजिता-विजेता या मुली इंडस्ट्रीपासून दूर आहेत.
हेमा मालिनीसोबत थाटला दुसरा संसार
प्रकाशकौर यांच्यासोबत लग्न झालेलं असतांनाही त्यांनी लग्नाच्या २६ वर्षानंतर हेमा मालिनीसोबत दुसरा संसार थाटला. एका सिनेमाच्या सेटवर या दोघांची मैत्री झाली आणि त्यानंतर ते प्रेमात पडले. याच प्रेमाचं रुपांतर लग्नातही झालं. १९८० मध्ये त्यांनी हेमा मालिनीसोबत दुसरं लग्न केलं. मात्र, प्रकाशकौर यांना घटस्फोट दिला नाही. या जोडीला ईशा आणि अहाना देओल या दोन मुली आहेत.
अनिता राजच्या प्रेमात पडले धर्मेंद्र
दोन संसार थाटल्यानंतरही धर्मेंद्र अभिनेत्री अनिता राजच्या प्रेमात पडले होते. अनिता त्यांच्यापेक्षा २७ वर्षांनी लहान असूनही ते तिच्या प्रेमात पडले होते. अनिता राजने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. धर्मेंद्र आणि अनिता यांनी 'इंसानियत के दुश्मन', 'नौकर बीवी का', 'जलजला' आणि 'करिश्मा कुदरत का' अशा कितीतरी सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. याच काळात त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.
हेमा मालिनीने दिली अनिताला समज
धर्मेंद्र आणि अनिता यांच्या अफेअरची चर्चा हेमा मालिनीच्या कानावर आली आणि तिचा चांगलाच तीळपापड झाला. त्यावेळी हेमा मालिनीने थेट अनिताची भेट घेतली आणि तिला धर्मेंद्रपासून दूर राहण्याा सल्ला दिला. त्यानंतर अनिताने धर्मेंद्रपासून अंतर राखायला सुरुवात केली.