दोन आठवड्यांनंतर, रणवीर इलाहाबादिया याला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; पासपोर्ट देण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 16:28 IST2025-04-01T16:28:33+5:302025-04-01T16:28:56+5:30

'जर पासपोर्ट जारी करण्याचा आदेश दिला तर त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो', असं न्यायालयाने म्हटले आहे.

After two weeks, Supreme Court gives blow to Ranveer Allahabadia refuses to issue passport | दोन आठवड्यांनंतर, रणवीर इलाहाबादिया याला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; पासपोर्ट देण्यास नकार

दोन आठवड्यांनंतर, रणवीर इलाहाबादिया याला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; पासपोर्ट देण्यास नकार

युट्यूबर रणवीर इलाहाबादिया याला सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. कोर्टाने त्याला पासपोर्ट देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने आता अलाहाबादिया याला दोन आठवड्यांनी येण्यास सांगितले आहे. 'जर पासपोर्ट जारी करण्याचा आदेश दिला तर त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो', असं न्यायालयाने म्हटले आहे. 

'इंडियाज गॉट लेटेंट' वादानंतर रणवीरचं कमबॅक, प्रदर्शित केला पहिला स्पिरिच्युअल पॉडकास्ट

चंद्रचूड यांनी रणवीर इलाहाबादिया यांच्या रोजीरोटीवर होणाऱ्या परिणामाचा हवाला देत पासपोर्ट सादर करण्याच्या अटीत सुधारणा करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती. यावर न्यायालयाने म्हटले की, त्याचे दोन पैलू आहेत. जर आम्ही तुम्हाला प्रवास करण्याची परवानगी दिली तर चौकशीवर परिणाम होईल आणि ती पुढे ढकलली जाऊ शकते. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या प्रकरणात सांगितले की, तपास पूर्ण करण्यासाठी आणखी २ आठवडे लागतील. यानंतर न्यायालयाने अलाहाबादिया याला दोन आठवड्यांनी येण्यास सांगितले. 

आणखी एकाला पासपोर्ट नाकारला

न्यायालयाने आणखी एक युट्यूबर आशिष चंचलानी याला पासपोर्ट देण्यासही नकार दिला. या सर्वांवर 'इंडियाज गॉट लेटेंट' या स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये अश्लील टिप्पण्या केल्याचा आरोप आहे. शो दरम्यान, काही लोकांनी पालकांबाबत अश्लील टिप्पण्या केल्या होत्या. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: After two weeks, Supreme Court gives blow to Ranveer Allahabadia refuses to issue passport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.