आलिया-रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' पाहून नीतू कपूर यांनी दिली 'ही' रिअॅक्शन, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 06:28 PM2022-09-10T18:28:25+5:302022-09-10T18:29:20+5:30
Brahmastra Movie: खरेतर ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि रणबीर-आलिया यांनी चित्रपटाच्या रिलीजच्या एक दिवस आधी त्यांच्या काही जवळच्या मित्रांसाठी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग ठेवले होते. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra Movie) ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी खूप विरोध झाला होता पण या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ चाहत्यांमध्येच नाही तर सेलिब्रिटींमध्येही या चित्रपटाबद्दल एक वेगळीच चर्चा आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३० कोटींची कमाई केल्याचे बोलले जात आहे. त्याच वेळी, आता रणबीर कपूरची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) स्वतः ब्रह्मास्त्रचा रिव्ह्यू देत आहेत, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खरेतर ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि रणबीर-आलिया यांनी चित्रपटाच्या रिलीजच्या एक दिवस आधी त्यांच्या काही जवळच्या मित्रांसाठी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग ठेवले होते. ज्याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये नीतू कपूर चित्रपट पाहिल्यानंतर दिग्दर्शक अयान मुखर्जीशी बोलताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एका पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
नीतू कपूर आणि अयान मुखर्जीचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. त्यात अयान नीतू कपूर यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकताना दिसतो आहे. व्हिडिओमध्ये, नीतू कपूर अयान मुखर्जीला 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाबद्दल सांगत आहेत की, 'चित्रपटाचा क्लायमॅक्स मनोरंजक आणि छान आहे, पण पुर्वाध... बनायला थोडा वेळ लागतो. पण एकदा चित्रपट सुरू झाला की.'
ब्रह्मास्त्र चित्रपट जगभरात ९००० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. आगाऊ तिकीट बुकिंगमधून या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी पहिल्यांदाच स्क्रीन स्पेस शेअर केली आहे. मात्र, या दोघांशिवाय 'ब्रह्मास्त्र'मध्ये अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन अक्किनेनी, डिंपल कपाडिया आणि दिव्येंदू शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्याचबरोबर 'ब्रह्मास्त्र'मध्ये शाहरुख खानचीही छोटी भूमिका आहे.