कंगना राणौतनं 'द कश्मीर फाइल्स' पाहिल्यानंतर बॉलिवूडवर साधला निशाणा, म्हणाली - 'बॉलिवूडचं पाप...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 11:16 AM2022-03-15T11:16:42+5:302022-03-15T11:17:20+5:30

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri)चा 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सिनेमा पाहिल्यानंतर कंगना रणौत(Kangana Ranaut)ने पुन्हा एकदा बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.

After watching 'The Kashmir Files', Kangana Ranaut took aim at Bollywood, saying - 'Bollywood's sin ...' | कंगना राणौतनं 'द कश्मीर फाइल्स' पाहिल्यानंतर बॉलिवूडवर साधला निशाणा, म्हणाली - 'बॉलिवूडचं पाप...'

कंगना राणौतनं 'द कश्मीर फाइल्स' पाहिल्यानंतर बॉलिवूडवर साधला निशाणा, म्हणाली - 'बॉलिवूडचं पाप...'

googlenewsNext

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri)चा 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सिनेमा पाहिल्यानंतर कंगना रणौत(Kangana Ranaut)ने पुन्हा एकदा बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. नुकतेच या चित्रपटाचे कौतुक करताना कंगना राणौतने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आणि बॉलिवूडलाही फटकारले आहे. द काश्मीर फाईल्सची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अनुपम खेर (Anupam Kher) आणि मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) स्टारर हा सिनेमा आता कंगना राणौतने देखील पाहिला आहे. कंगना राणौतने थिएटरमधून बाहेर येताच मीडियासमोर आपली बाजू मांडली. अभिनेत्रीने द काश्मीर फाइल्सच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे आणि बॉलीवूड स्टार्सना पुढे येऊन चित्रपटाचे प्रमोशन करण्यास सांगितले आहे.

कंगना रनौतने द काश्मीर फाेइल्स पाहिल्यानंतर थिएटरमधून बाहेर पडताच ज्या पद्धतीने तिचा मुद्दा मांडला त्याचे लोक कौतुक करत आहेत. कंगनाने म्हटले आहे की, 'चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन... बॉलिवूडने केलेले पाप... आज या सर्व लोकांनी मिळून ती सर्व पापं धुवून काढली आहेत. इतका चांगला चित्रपट बनवला आहे. हा चित्रपट इतका प्रशंसनीय आहे की इंडस्ट्रीतील जे लोक अजूनही आपल्या बिळात उंदरांसारखे दडलेले आहेत... त्यांनी बाहेर यावे. त्याचा प्रचार व्हायला हवा. बकवास चित्रपटांना प्रोत्साहन देतात. त्यापेक्षा अशा चांगल्या चित्रपटांना प्रोत्साहन द्या.'


दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटात काश्मीरचे सत्य दाखवले आहे, जे अनेकांचे मन हेलावून टाकते. ९० च्या दशकात काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून हाकलून देण्यात आले होते. या कमी बजेटच्या चित्रपटाने तीन दिवसांत २७.१५ कोटींचा व्यवसाय केला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या ताज्या अहवालात, चित्रपटाने चौथ्या दिवशी (सोमवार) सुमारे १६ कोटींचा व्यवसाय केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाची एकूण कमाई ४३ कोटी होईल.

Web Title: After watching 'The Kashmir Files', Kangana Ranaut took aim at Bollywood, saying - 'Bollywood's sin ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.