'अग्गंबाई सासूबाई' फेम तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की मालिका नाही तर दिसणार या नाटकात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 05:32 PM2021-08-18T17:32:08+5:302021-08-18T17:32:54+5:30

तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की लवकरच एका प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहे.

'Aggabai Sasubai' fame Tejashree Pradhan and Ashutosh Patki will not appear in the series but in this play | 'अग्गंबाई सासूबाई' फेम तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की मालिका नाही तर दिसणार या नाटकात

'अग्गंबाई सासूबाई' फेम तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की मालिका नाही तर दिसणार या नाटकात

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका अग्गंबाई सासूबाईने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर कायम केले आहे. या मालिकेत शुभ्रा आणि सोहमची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता आशुतोष पत्की आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या जोडीला पुन्हा काम करताना पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. लवकरच ते दोघे एका प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहेत. 

तेजश्री प्रधान हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, हे रसिक प्रेक्षका. माझ्या सारखीच तुमचीही इच्छा असेल की लवकरच आपली नाट्यगृह पुन्हा सुरू व्हावीत. आणि आम्ही छान काहीतरी कलाकृती सादर करायला आणि तुम्ही ती पाहायला जवळच्या नाट्यगृहात यावं... पण तो पर्यंत एका वेगळ्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर आमची कला सादर करीत आहोत. चूक भूल द्यावी घ्यावी. नाट्यमंच या डिजिटल माध्यामातून नाटकांना जिवंत ठेवण्यासाठी तुमचे खूप आभार.


तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की साटंलोटं या नाटकात दिसणार आहे. या नाटकाचे लेखन रत्नाकर मतकरी यांनी केले आहे. तर दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे. या नाटकात तेजश्री आणि आशुतोषसोबत स्वाती चिटणीस, अजित भुरे, विनिता दाते हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

यापूर्वी तेजश्री व आशुतोष यांनी एका लघुपटात एकत्र काम केले आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन आशुतोषने आणि लेखन तेजश्रीने केले होते. त्यानंतर आता या दोघांना एकत्र काम करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: 'Aggabai Sasubai' fame Tejashree Pradhan and Ashutosh Patki will not appear in the series but in this play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.