दोन ठाकरे बंधू आमदारकीच्या शर्यतीत, तर तिसरा सुपुत्र बॉलिवूडमध्ये आजमावतोय नशीब, कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 06:03 PM2024-10-23T18:03:57+5:302024-10-23T18:13:57+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबीय सक्रिय असताना मात्र ठाकरेंच्या एका सुपुत्राने वेगळी वाट धरली.

राज्यात सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. यंदा ठाकरे कुटुंबातील दोन सुपुत्र निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून वरळी येथून निवडणूक लढवणार आहेत. तर अमित ठाकरेंना माहीम येथून मनसेचं तिकीट मिळालं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबीय सक्रिय असताना मात्र ठाकरेंच्या एका सुपुत्राने वेगळी वाट धरली.

राजकीय आखाडा सोडून बाळासाहेब ठाकरेंच्या या नातवाने बॉलिवूडमध्ये करिअर करत आपलं नशीब आजमावनं पसंत केलं.

ठाकरे घराण्याचा हा सुपुत्र दुसरा तिसरा कोणी नसून ऐश्वर्य ठाकरे आहे. ऐश्वर्य राजकारण सोडून अभिनयात करिअर करत आहे.

गेली पाच वर्ष ऐश्वर्य बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी धडपडत आहे. एका प्रोजेक्टमध्ये साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर त्याचा प्रवास सुरू झाला.

ऐश्वर्य हा बाळासाहेबांचे पुत्र जयदेव ठाकरे आणि त्यांची पत्नी स्मिता ठाकरे यांचा धाकटा मुलगा आहे.तर त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव राहुल आहे.

स्मिता ठाकरे या एक यशस्वी निर्मात्या आहेत. त्यांनी आजवर अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे.

ऐश्वर्यनेही राजकारणाकडे न वळता आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं.

अभिनेता असण्याबरोबरच तो एक उत्तम डान्सरही आहे. सोशल मीडियावरही तो प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.