ना बॉलिवूड, ना साऊथ… मराठी लोकगीतावर नारकर जोडप्याचा भन्नाट डान्स, Video पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 02:12 PM2024-07-26T14:12:25+5:302024-07-26T14:12:36+5:30

ऐश्वर्या यांनी आपल्या डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Aishwarya And Avinash Narkar Dances On Marathi Lokgeet Of Maharashtra Video Viral | ना बॉलिवूड, ना साऊथ… मराठी लोकगीतावर नारकर जोडप्याचा भन्नाट डान्स, Video पाहा

ना बॉलिवूड, ना साऊथ… मराठी लोकगीतावर नारकर जोडप्याचा भन्नाट डान्स, Video पाहा

अलीकडच्या काळात प्रत्येकाला इन्स्टाग्राम रील्सची भुरळ पडताना दिसत आहे.  नेहमीच विविध गाणी व्हायरल होत असतात. सामान्य लोकांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या व्हायरल गाण्यांवर थिरकत असतात. सध्या जुन्या लोकगीतांचा ट्रेंड सुरू आहे. अशाच एकालोकगीताने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ते गाणं म्हणजे 'गणबाई मोगरा गणाची साडी' हे मराठी लोकगीत. या लोकगीतावर मराठी मनोरंजन विश्वातील ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) व अविनाश नारकर (Avinash Narkar)  यांच्या जोडीने भन्नाट डान्स केलाय. 

ऐश्वर्या यांनी आपल्या डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 'तुळजाभवानी आई' असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओमध्ये दिसतं की, अविनाश यांनी पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान केलेला आहे. तर ऐश्वर्या नेहमीप्रमाणे यावेळी साडीत अगदी सुंदर दिसत आहेत. दोघांच्या या डान्सनं सर्वांचं मन जिंकलं असून  नेटकऱ्यांनी या जोडप्याचं भरभरून कौतुक केलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. बऱ्याचदा ते ट्रेडिंग रिलवर थिरकताना दिसतात. बऱ्याचदा त्यांचे रिल सोशल मीडियावर व्हायरल होताना मिळतात. या कपलचा मोठा चाहता वर्ग आहे. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या या एव्हरग्रीन कपलची एनर्जी भल्याभल्यांना लाजवेल अशीच आहे. आजवर दोघांनी विविध नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता अभिनयाव्यतिरिक्त दोघेही विविध गाण्यांवर इन्स्टाग्राम रील्स बनवून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. 

Web Title: Aishwarya And Avinash Narkar Dances On Marathi Lokgeet Of Maharashtra Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.