अविनाश नारकरांचा अफलातून डान्स पाहिलात का? डान्सच्या बाबतीत पत्नी ऐश्वर्यालाही टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 11:35 AM2023-03-03T11:35:19+5:302023-03-03T11:36:17+5:30

Avinash narkar: सलमान खानच्या गाण्यावर अविनाश नारकरांनी धरला ठेका

aishwarya narkar husband actor avinash narkar crazy dance reel video | अविनाश नारकरांचा अफलातून डान्स पाहिलात का? डान्सच्या बाबतीत पत्नी ऐश्वर्यालाही टाकलं मागे

अविनाश नारकरांचा अफलातून डान्स पाहिलात का? डान्सच्या बाबतीत पत्नी ऐश्वर्यालाही टाकलं मागे

googlenewsNext

सोशल मीडिया हे सध्याच्या काळात प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटीदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत असतात. यात अनेकदा ते त्यांच्या वैयक्तिक जीवनातील काही किस्से, सेटवरील धम्माल मस्ती  यांचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. इतकंच नाही तर ही कलाकार मंडळी नवनवीन ट्रेंडही फॉलो करत असतात. असाच एक ट्रेंड अभिनेता अविनाश नारकर (avinash narkar) यांनी फॉलो केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकरचा (aishwarya narkar) पती आणि अभिनेता अविनाश नारकर हे सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहे. ते बऱ्याचदा सोशल मीडियावर नवनवीन रिल्स, डान्स व्हिडीओ पोस्ट करत असतात. यावेळीदेखील ते असाच एक व्हिडीओ पोस्ट करुन चर्चेत आले आहेत.

अविनाश नारकर यांनी त्यांच्या कलिग्ससोबत 'चांदी की डाल' या सलमान खानच्या गाण्यावर अफलातून डान्स केला आहे. विशेष म्हणजे ते ज्या पद्धतीने हा डान्स एन्जॉय करत आहेत. ते पाहून नेटकरी कमालीचे खूश झाले आहेत. इतकंच नाही तर अनेक सेलिब्रिटींनीही त्यावर कमेंट दिल्या आहेत.
दरम्यान, अविनाश नारकर मस्त एन्जॉय करुन डान्स करत असल्यामुळे त्यांच्या पुढे पती ऐश्वर्या नारकर यांचाही डान्स फिका पडल्याचं मत अनेक चाहत्यांनी केलं आहे. अविनाश नारकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. 'बालगंधर्व', 'अजिंठा', 'बालक पालक' अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. 
 

Web Title: aishwarya narkar husband actor avinash narkar crazy dance reel video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.