इरफानसोबत ऐश्वर्याची जोडी

By Admin | Published: August 29, 2014 01:42 AM2014-08-29T01:42:34+5:302014-08-29T01:42:34+5:30

अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनच्या बॉलीवूड कमबॅकबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

Aishwarya pair with Irfan | इरफानसोबत ऐश्वर्याची जोडी

इरफानसोबत ऐश्वर्याची जोडी

googlenewsNext

अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनच्या बॉलीवूड कमबॅकबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. संजय गुप्ताच्या ‘जज्बा’ या अ‍ॅक्शन सस्पेन्स चित्रपटातून ऐश्वर्या चित्रपटांत परतणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. या चित्रपटाबाबत नवी बातमी अशी की, चित्रपटात ऐश्वर्यासोबत इरफान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात ऐश्वर्या वकिलाच्या, तर इरफान एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. ऐश्वर्या पहिल्यांदाच वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. ऐश्वर्या इरफान यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. आता ही जोडी काय कमाल दाखवते ते चित्रपट रिलीज झाल्यावरच कळू शकेल.

Web Title: Aishwarya pair with Irfan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.