या हिरोईनला ओळखलं का? आईसोबत केक कापणारी ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 06:07 PM2022-03-02T18:07:33+5:302022-03-02T18:08:14+5:30
Guess Who : फोटो इतका गोड आहे की, तो पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह व्हावा. पण या फोटोतील चिमुकली अभिनेत्री कोण? तुम्ही ओळखलंत का?
सोशल मीडियावर कधी कुठला ट्रेंड येईल, याचा नेम नाही. सध्या ट्रेंड आहे तो स्टार्सच्या बालपणींच्या फोटोंचा. होय, सलमान, शाहरूखपासून शिबानी दांडेकरपर्यंतच्या अनेक सेलिब्रिटींच्या बालपणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका अभिनेत्रीचा तिच्या आईसोबतचा फोटोही असाच तुफान व्हायरल होतोय.
होय, या फोटोत अभिनेत्री तिच्या आईसोबत दिसतेय. आईसोबत ती केक कापताना दिसतेय. फोटो इतका गोड आहे की, तो पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह व्हावा. पण या फोटोतील चिमुकली अभिनेत्री कोण? हे तुम्ही ओळखलंत का?
अद्यापही तुम्ही तिला ओळखू शकले नसाल तर ती दुसरी कुणी नसून मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड स्टार ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan ) आहे. या फोटोत ऐश्वर्या तिची आई वृंदा रॉयसोबत दिसतेय. आता ती बच्चन कुटुंबाची सून आहे.
दाक्षिणात्य कुटुंबात जन्मलेली ऐर्श्वया मूळची मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा. ऐश्वर्याच्या जन्मानंतर राय कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. ऐश्वर्याचं अख्खे बालपण मुंबईत गेलं आणि याच मुंबईत राहून तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
अगदी जगतसुंदरीचा किताब जिंकण्यापासून तर बॉलिवूड, हॉलिवूडची अभिनेत्री म्हणून मिरवण्यापर्यंत आणि कान्सच्या रेड कार्पेटवर मिरवण्यापर्यंतचा तिचा प्रवास डोळे दिपवणारा आहे.ऐश्वर्यानं आर्किटेक्चर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.
माटुंग्याच्या रूपारेल कॉलेजात तिचं शिक्षण झालं. पुढे ऐश्वर्या आपसूकच मॉडेलिंगच्या क्षेत्रात ओढली गेली. या मॉडेलिंगच्या दुनियेत वावरत असताना मिस इंडिया स्पर्धेत तिने भाग घेतला. पण या स्पर्धेत सुश्मिता सेन अव्वल ठरली आणि ऐश्वयार्ला दुसरा क्रमांक मिळाला. अर्थात पुढे मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतल्यानंतर जगतसुंदरीचा मुकूट तिच्या डोक्यावर सजला. मिस इंडिया, मिस वर्ल्ड स्पर्धेनंतर बॉलिवूडमध्ये ती आली.
मणिरत्नम यांच्या ‘इरूवर’ चित्रपटातून ऐश्वर्याच्या रूपेरी कारकीर्दीस सुरूवात झाली. बॉबी देवलसोबतचा ‘और प्यार हो गया’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. यानंतर हम दिल दे चुके सनम, देवदास, ताल, चोखेर बाली, रेनकोट, जोधा अकबर असे अनेक हिट सिनेमे तिने दिलेत. हॉलिवूड सिनेमांतही तिची वर्णी लागली. कान्स चित्रपट महोत्सवात ज्युरी बनण्याचा मान मिळालेली ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे.