सलमान खानविरोधात ऐश्वर्या रायची याचिका

By Admin | Published: April 26, 2016 12:37 PM2016-04-26T12:37:48+5:302016-04-26T12:54:24+5:30

अभिनेता सलमान खानला रिओ ऑलिम्पिकचा सदिच्छादूत करु नये यासाठी ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली आहे

Aishwarya Rai petition against Salman Khan | सलमान खानविरोधात ऐश्वर्या रायची याचिका

सलमान खानविरोधात ऐश्वर्या रायची याचिका

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 25 - अभिनेता सलमान खानला रिओ ऑलिम्पिकचा सदिच्छादूत केल्यापासून वाद निर्माण झाला आहे. चित्रपटसृष्टीतील काही कलाकार आणि क्रिडापटू सलमान खानच्या नियुक्तीला समर्थन करत असताना दुसरीकडे योगेश्वर दत्त, मिल्खा सिंग यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. आता विरोध करणा-यांमध्ये भर पडली आहे ती ऐश्वर्या रायची. मात्र ही व्यक्ती अभिनेत्री ऐश्वर्या राय नसून त्याच नावाची व्यक्ती आहे. 
 
अभिनेता सलमान खानला रिओ ऑलिम्पिकचा सदिच्छादूत करु नये यासाठी ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली आहे. चेंज.ओआरजी (Change.org) यावर ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली असून योगायोगाने याचिका दाखल करणा-या व्यक्तीचं नाव ऐश्वर्या राय आहे. 'बॅन सलमान खान फ्रॉम बिइंग गुडविल अॅम्बेसिडर 2016 रिओ' नावाने ही ऑनलाइन याचिका सुरु करण्यात आली आहे. 
 
या याचिकेला 246 लोकांनी समर्थन केलं आहे. सलमान खानने महिलांशी गैरवर्तन केलं आहे, समाजाला त्यांच्यापासून धोका आहे, त्याने निर्दोष लोकांचा बळी घेतला आहे त्यामुळे त्याला सदिच्छादूत करण्यात येऊ नये असा दावा याचिकाकर्त्या ऐश्वर्या रायने केलं आहे.
 

Web Title: Aishwarya Rai petition against Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.