सुंदरतेत एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे आहे ऐश्वर्या रायची वहिनी, पाहा फोटो !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 02:31 PM2018-06-08T14:31:47+5:302018-06-08T20:01:47+5:30
बॉलिवूडमध्ये बरेचसे असे कलाकार आहेत, ज्यांचे नातेवाईक फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहेत; मात्र अशातही ते कुठल्या ना कुठल्या कारणांनी चर्चेत ...
ब लिवूडमध्ये बरेचसे असे कलाकार आहेत, ज्यांचे नातेवाईक फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहेत; मात्र अशातही ते कुठल्या ना कुठल्या कारणांनी चर्चेत असतात. अशात आज आम्ही बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिच्या वहिनीविषयी सांगणार आहोत. ऐशची वहिनी सौंदर्याच्या बाबतीत कोण्या अभिनेत्री किंवा मॉडेलपेक्षा कमी नाही. तिचे सौंदर्य घायाळ करणारे असून, तिने बॉलिवूडमध्ये का करिअर केले नसावे ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
ऐश्वर्याचा नुकताच एक फोटो समोर आला ज्यामध्ये ती संपूर्ण परिवारासह फोटोमध्ये बघावयास मिळत आहे. फोटोत तिची वहिनीही दिसत आहे. ऐश्वर्याच्या भावाचे नाव आदित्या राय आहे. आदित्या मर्चण्ट नेव्हीमध्ये इंजिनिअर होता. त्याचबरोबर ‘दिल का रिश्ता’ या चित्रपटाचा तो निर्माताही होता. या चित्रपटात ऐश्वर्या मुख्य भूमिकेत बघावयास मिळाली होती.
वास्तविक बºयाचशा घरांमध्ये सासू-सून आणि नणंद-भावजयचे अजिबातच जमत नाही. काही घरांमध्ये तर हे नाते अधिकच टोकाचे होऊन जाते; परंतु ऐश्वर्या आणि तिची वहिनी श्रीमा राय यांच्यातील नाते खूपच चांगले आहे. दोघींमधील केमिस्ट्री खरोखरच वाखणण्याजोगी आहे. श्रीमा राय एक हाउसवाइफ आहे; परंतु फॅशन आणि ब्लॉगिंगवर ती नेहमीच काम करताना बघावयास मिळते. त्यामुळे ऐश आणि श्रीमा यांना बºयाचदा एकत्रही बघायला मिळते.
श्रीमा दोन मुलांची आई आहे; परंतु अशातही तिने स्वत:ला खूप मेंटेन ठेवले आहे. ती एकदम फिट असून, त्याकडे ती नेहमीच लक्ष देताना दिसते. बºयाच लोकांचे तर असेही म्हणणे आहे की, ऐशपेक्षा तिची वहिनी अधिक सुंदर आहे.