ऐश्वर्या रायला पितृशोक, कृष्णराज राय यांचे निधन

By Admin | Published: March 18, 2017 10:01 PM2017-03-18T22:01:05+5:302017-03-18T22:01:05+5:30

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचे वडील कृष्णराज राय यांचे निधन झाले आहे

Aishwarya Raya Pitrushok, Krishnaraj Rai passed away | ऐश्वर्या रायला पितृशोक, कृष्णराज राय यांचे निधन

ऐश्वर्या रायला पितृशोक, कृष्णराज राय यांचे निधन

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचे वडील कृष्णराज राय यांचे निधन झाले आहे. ते ७२ वर्षांचे होते. कृष्णराज राय यांची प्रकृती खालावल्यामुळे, काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय यांनी अखेरचा श्वास घेतला. 
 
गेल्या महिन्याभरापासून कृष्णराज राय यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. ७२ वर्षांच्या कृष्णराज राय यांची तब्येत जानेवारी महिन्यापासूनच ठीक नव्हती. त्यानंतर, काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने, त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्याच आठवड्यात त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कृष्णराज राय यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ऐश्वर्या अभिषेक बच्चनसोबत रुग्णालयात गेली होती. अमेरिका दौऱ्याहून परतलेला अभिषेक तत्काळ ऐश्वर्यासोबत रुग्णालयात गेला होता. 

Web Title: Aishwarya Raya Pitrushok, Krishnaraj Rai passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.