ऐश्वर्याची मुलगी रणबीर कपूरला समजली बाबा

By Admin | Published: October 20, 2016 12:21 PM2016-10-20T12:21:21+5:302016-10-20T12:26:45+5:30

ऐश्वर्या आणि रणबीर कपूरने नुकतेच केलेल्या मॅगझिन शूटवेळी आराध्याने चक्क रणबीरला बाबा समजून मिठी मारली.

Aishwary's daughter Ranbir Kapoor understood Dad | ऐश्वर्याची मुलगी रणबीर कपूरला समजली बाबा

ऐश्वर्याची मुलगी रणबीर कपूरला समजली बाबा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 20 - लहान मुले कधी काय करतील आणि कसे वागतील, याचा काही नेम नाही. अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची गोड मुलगी 'आराध्या'देखील याला अपवाद नाही. ऐश्वर्या आणि रणबीर कपूरने नुकतेच केलेल्या मॅगझिन शूटवेळी आराध्याने चक्क रणबीरला तिचा बाबा समजून मिठी मारली.
 
हे आम्ही नाही, तर खुद्द ऐश्वर्यानेच सांगितले आहे. रणबीरसोबत मॅगझिनचे फोटोशूट करत असताना, 'आराध्या रणबीरला आपला बाबा समजली. रणबीरने अभिषेकप्रमाणेच कॅप आणि जॅकेट घातले होते आणि त्याला थोडीशी दाढीही असल्यामुळे, आराध्याला रणबीर तिचा बाबा वाटला. त्यानंतर त्याच्या दिशेने धावत जाऊन तिने रणबीरला अभिषेक समजून मिठी मारली', असे ऐश्वर्याने सांगितले.  यावेळी रणबीरदेखील आश्चर्यचकीत झाला. 
आणखी बातम्या
वयाच्या ४२ व्या वर्षीही 'ऐश्वर्या' करते घायाळ ( फोटो गॅलरी)
 
काही वेळाने, हा आपला बाबा नसून रणबीर असल्याचे आराध्याच्या लक्षात आले. त्यावर ती केवळ निरागस हसली.  रणबीरला आराध्या आर.के. म्हणून हाक मारते.  यानंतर दोघांनीही सेटवर धम्माल मस्ती केल्याचेही ऐश्वर्याने सांगितले.

Web Title: Aishwary's daughter Ranbir Kapoor understood Dad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.