पान मसालाच्या जाहिरातीवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर अजय देवगणची प्रतिक्रिया, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 12:07 PM2024-11-10T12:07:14+5:302024-11-10T12:08:14+5:30

अजय देवगणची ट्रोलिंगवर रिअॅक्शन

Ajay Devgan s reaction to trolling over Pan Masala advertisement says it dosent matter | पान मसालाच्या जाहिरातीवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर अजय देवगणची प्रतिक्रिया, म्हणाला...

पान मसालाच्या जाहिरातीवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर अजय देवगणची प्रतिक्रिया, म्हणाला...

रोहित शेट्टी आणि अजय देवगण (Ajay Devgn) ही सुपरहिट जोडी आहे. दिग्दर्शिक- अभिनेत्याच्या या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. 'गोलमाल', 'सिंघम' या सिनेमांनी तर बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड रचले आहेत. नुकताच रिलीज झालेल्या 'सिंघम अगेन' ने पहिल्या दोन दिवसातच १०० कोटी कमावले. रोहित शेट्टी आणि अजय देवगणने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी अजय देवगणने ट्रोलिंगवर भाष्य केलं.

अजय देवगण पान मसाल्याची जाहिरात करत असल्याने अनेकदा ट्रोल होतो. 'जुबा केसरी'चे त्याचे अनेक मीम्सही व्हायरल होतात. रणवीर अलाहाबादियाने त्याच्या पॉडकास्टमध्ये या ट्रोलिंगवर विचारलं असता अजय देवगण म्हणाला,   "ठिके, मला फरक पडत नाही. मी एन्जॉय करतो." तर रोहित शेट्टी म्हणाला, "आता त्यावरुन आक्षेपार्ह वाटणं बंद झालं आहे.  आता मीम्स मधून सगळे एन्जॉय करत आहेत. गोलमाल, ऑल द बेस्टचेही आता कितीतरी मीम्स पुन्हा व्हायरल होत आहेत. यावरुन कळतं की प्रेक्षकांना पुन्हा हे सिनेमे हवे आहेत."


अजय देवगणसोबत शाहरुख खान, अक्षय कुमारनेही पान मसालाची जाहिरात केली. मात्र नंतर अक्षय कुमारने माफी मागत या जाहिरातींमधून काढता पाय घेतला. अजय देवगणला आजही त्या जाहिरातींमुळे ट्रोल केले जाते. मात्र ते तो एन्जॉय करत असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.

Web Title: Ajay Devgan s reaction to trolling over Pan Masala advertisement says it dosent matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.