‘त्या’ एका फोन कॉलनं घोळ केला आणि करिश्मा-अजयचं नेहमीसाठी बिनसलं; वाचा, नेमकं काय झालं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 08:00 AM2022-04-02T08:00:00+5:302022-04-02T08:00:02+5:30

Ajay Devgn Birthday Special : होय, काजोलची एन्ट्री झाली नसती तर कदाचित अजय आज कपूर घराण्याचा जावई असता...

Ajay Devgn Birthday Special Ajay Devgn Left Karisma Kapoor And Married Kajol | ‘त्या’ एका फोन कॉलनं घोळ केला आणि करिश्मा-अजयचं नेहमीसाठी बिनसलं; वाचा, नेमकं काय झालं होतं?

‘त्या’ एका फोन कॉलनं घोळ केला आणि करिश्मा-अजयचं नेहमीसाठी बिनसलं; वाचा, नेमकं काय झालं होतं?

googlenewsNext

Ajay Devgn Birthday Special : ‘फूल और कांटे’ या सिनेमातून त्याचा धडाकेबाज डेब्यू झाला आणि त्यानंतर जिगर, संग्राम, दिलवाले,  दिलजले, जख्म, हम दिल दे चुके सनम, कंपनी, दीवानगी, द लीजेंड ऑफ भगत सिंग, सिंघम, तान्हाजी असे एक ना अनेक सिनेमे करून तो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. आम्ही कोणाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच. त्याचं नाव अजय देवगण (Ajay Devgn). या बॉलिवूडच्या ‘सिंघम’चा आज वाढदिवस.

अजयने बॉलिवूडच्या अनेक बड्या अभिनेत्रींसोबत काम केलं. यापैकीच एक आहे काजोल (Kajol). पुढे अजय याच काजोलच्या प्रेमात पडला आणि तिच्याचसोबत त्यानं संसारही थाटला. आज दोघांना दोन मुलं आहेत. हे चौकोनी कुटुंब  सुखात नांदतंय. पण तुम्हाला  माहित नसेल की, काजोलची एन्ट्री झाली नसती तर कदाचित अजय आज कपूर घराण्याचा जावई असता.  आज आम्ही याचबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.


 
तर काजोल आयुष्यात येण्यापूर्वी अजय कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूरच्या (Karisma Kapoor) प्रेमात होता.  अजय स्ट्रगल करत होता आणि करिश्मा त्यावेळी आघाडीची अभिनेत्री होती. त्याचकाळात अजय व करिश्माच्या अफेअरच्या चर्चा जोरात सुरु होत्या. दोघांनीही कधीच आपल्या नात्याची कबुली दिली नाही. पण चर्चा खरी मानाल तर अजय व करिश्मा बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काजोलची एन्ट्री झाली आणि अजय व करिश्माच्या नात्याला अचानक ब्रेक लागला.

अजय आणि काजोलची पहिली भेट 1995 मध्ये मध्ये ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. अजयला भेटण्याआधीपासून काजोल तिच्या एका मित्राला डेट करत होती. दुसरीकडे अजय करिश्माच्या प्रेमात होता. अजय व करिश्माचं तसं बरं सुरू होतं. पण काजोलच्या ‘लव्ह लाईफ’मध्ये काही प्रॉब्लेम्स सुरु होते. अजय व काजोलची चांगली मैत्री झाल्यावर काजोल तिचे हे प्रॉब्लेम अजयसोबत शेअर करायला लागली.

एकेदिवशी काजोल तिच्या बॉयफ्रेन्डसोबतचे हेच प्रॉब्लेस अजयसोबत शेअर करत बसली होती. इतक्याच अजयचा फोन खणखणला. पलीकडे करिश्मा होती. अजयने फोन उचलला आणि तो बोलू लागला. पण हे बोलणं सुरू असतानाच  तिला एका मुलीचा आवाज ऐकू आला. याचा अर्थ काय तर अजय दुस-या मुलीसोबत आहे, असा अंदाज काढून करिश्मा मोकळी झाली. तिथून करिश्माच्या मनात खदखद सुरू झाली.  काही दिवसानंतर अजयसोबत असलेली ती मुलगी दुसरी कोणी नसून काजोल असल्याचं करिश्माला कळलं. मग तर आणखीच बिनसलं.  इथून अजय व करिश्मांमध्ये गैरसमज वाढू लागले. याची परिणीती काय तर ब्रेकअप .

एकीकडे अजय व करिश्माचं ब्रेकअप झालं. दुसरीकडे काजोलचंही तिच्या बॉयफ्रेन्डचं रिलेशनशिप संपलं.  यानंतर काय झालं, हे तुम्हाला ठाऊक आहेच.

Web Title: Ajay Devgn Birthday Special Ajay Devgn Left Karisma Kapoor And Married Kajol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.