पुन्हा होणार आयकर विभागाची छापेमारी, अजय देवगणच्या 'रेड 2' ची रिलीज डेट आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 05:16 PM2024-09-11T17:16:56+5:302024-09-11T17:17:59+5:30

'रेड 2' कधी रिलीज होणार याची तारीख समोर आली आहे.

Ajay Devgn starrer Raid 2 release date out know more details about the film | पुन्हा होणार आयकर विभागाची छापेमारी, अजय देवगणच्या 'रेड 2' ची रिलीज डेट आऊट

पुन्हा होणार आयकर विभागाची छापेमारी, अजय देवगणच्या 'रेड 2' ची रिलीज डेट आऊट

२०१८ साली आलेला अजय देवगणचा (Ajay Devgn) 'रेड' (Raid 2) सिनेमा सगळ्यांच्याच लक्षात असेल. भ्रष्टाचाऱ्यांनी घरात कुठे कुठे पैसे लपवले असतात याचं वास्तव सिनेमाने मांडलं होतं. प्रेक्षकांना सिनेमा प्रचंड आवडला. काही दिवसांपूर्वी सिनेमाच्या सीक्वेलची घोषणा झाली होती. अजय देवगणच यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता नुकतंच 'रेड 2' कधी रिलीज होणार याची तारीखही समोर आली आहे.

राज कुमार गुप्ता यांनी 'रेड' चं दिग्दर्शन केलं होतं. आता सिनेमाच्या सीक्वेलची तयारी सुरु आहे. राज कुमार गुप्ताच याचं दिग्दर्शन करणार आहे.  चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सिनेमाची रिलीज डेट जाहीर ट्वीट करत सांगितली आहे. सोबतच फिल्मचा प्लॉट आणि शूटिंग लोकेशनचाही खुलासा झाला आहे. रेड प्रमाणेच रेड २ मध्येही आयकर विभागाची छापेमारी दाखवण्यात येणार आहे. सिनेमात अजय देवगण शिवाय रितेश देशमुख, वाणी कपूर यांचीही भूमिका आहे. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. दिल्ली आणि लखनऊमध्ये सिनेमाचं शूट सुरु आहे.

'रेड 2' मध्ये रितेश देशमुख आणि वाणी कपूर ही नवीन स्टारकास्ट सामील करण्यात आली आहे. तसंच पहिल्या भागात इलियाना डिक्रुझ होती आता दुसऱ्या भागात ती असणार की नाही यावर काही माहिती आलेली नाही.

अजय देवगण सध्या 'सन ऑफ सरदार 2' च्या शूटमध्येही व्यस्त आहे. याशिवाय त्याचे आणखी काही सिनेमे रिलीज होणार आहेत. अजयच्या सिनेमांकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Web Title: Ajay Devgn starrer Raid 2 release date out know more details about the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.