Ajay Devgn: “मी बोललो तर...”, लेक न्यासाच्या ट्रोलिंगमुळे त्रासला अजय देवगण, वाचा काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 10:27 AM2023-03-16T10:27:58+5:302023-03-16T10:28:36+5:30

Ajay Devgn, Nysa Devgn : अजयची लेक न्यासा कधी रंगरूपामुळे, कधी बोल्ड कपड्यांमुळे, कधी बॉलिवूड पार्ट्यांमुळे ट्रोल होत असते. आता अजय देवगण यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ajay devgn talk About His Daughter Nysa Trolling | Ajay Devgn: “मी बोललो तर...”, लेक न्यासाच्या ट्रोलिंगमुळे त्रासला अजय देवगण, वाचा काय म्हणाला?

Ajay Devgn: “मी बोललो तर...”, लेक न्यासाच्या ट्रोलिंगमुळे त्रासला अजय देवगण, वाचा काय म्हणाला?

googlenewsNext

Ajay Devgn, Nysa Devgn : अजय देवगण तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून बॉलिवूडमध्ये आहे. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्याने अनेक चढऊतार पाहिलेत. आता त्यात सोशल मीडिया ट्रोलिंगची भर पडली आहे. अजय नाही पण त्याची लेक न्यासा देवगण सोशल मीडियावर सतत ट्रोल होत असते. कधी रंगरूपामुळे, कधी बोल्ड कपड्यांमुळे, कधी बॉलिवूड पार्ट्यांमुळे न्यासा सतत ट्रोल होत असते. आता अजय देवगणने लेकीला केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

अजय व काजोलची १९ वर्षांनी लेक न्यासा सध्या शिकतेय. न्यासाचा बॉलिवूडमध्ये येण्याचा काहीही इरादा नसल्याचं अजय व काजोलने वेळोवेळी सांगितलं आहे. पण न्यासा अनेकदा बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये दिसते. अलीकडे या पार्ट्यांमधील तिचा बोल्ड लुक पाहून सोशल मीडिया युजर्सनी तिला नको एवढं ट्रोल केलं होतं. फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत अजय नेमका यावर बोलला.

काय म्हणाला अजय...?
ट्रोलिंगचा त्रास करून घ्यायचा नाही, हे आम्ही सतत मुलांना समजावत असतो. कोणत्याही ऑनलाईन लिहिलेल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका, असं मी माझ्या दोन्ही मुलांना सांगत असतो.  लोकांकडे इतकी नकारात्मकता कुठून येते, हे मला माहित नाही. पण आता मी तरी त्याकडे दुर्लक्ष करायला शिकलो आहे आणि हेच मी माझ्या मुलांनाही करायला सांगतो, असं तो म्हणाला.

मी त्रासलो आहे...
विशेषत: न्यासाच्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, न्यासाला लोक ट्रोल करतात, हे मला प्रचंड त्रास देतं. मी यामुळे त्रस्त आहे. पण मी हे बदलू शकत नाही. अनेकदा कल्पनाही करवत नाही, असं काही ट्रोलर्स लिहून जातात. अनेकदा असत्य गोष्टी लिहिल्या जातात. पण काय करणार? मी हे बदलू शकत नाही. यावर मी काही बोललो तर परिस्थिती अजूनच बिघडेल, ते आणखी वाढवून चढवून लिहितील.
अजयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच त्याचा भोला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. येत्या ३० मार्चला येऊ घातलेल्या या सिनेमात अजयसोबत तब्बू लीड रोलमध्ये दिसणार आहे.

Web Title: ajay devgn talk About His Daughter Nysa Trolling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.