अक्षय-राणीचा आजपर्यंत एकही सिनेमा नाही, अखेर सत्य आलं समोर; 'राणीने सलग तीन...'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 03:54 PM2023-04-16T15:54:19+5:302023-04-16T15:55:09+5:30
कधी विचार केलाय का की इतक्या वर्षात अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी यांनी एकाही चित्रपटात एकत्र काम का केले नाही.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) काम करायला कोण नकार देईल. कित्येक अभिनेत्री त्याच्यासोबत काम करण्यासाठी आतुर असतात. 90 च्या दशकापासूनच बॉलिवूडमध्ये अक्षयने स्वत:ची वेगळी जागा बनवली आहे. रवीना, शिल्पा, करिना यांच्यासोबत अक्षयची जोडी हिट झाली. पण कधी विचार केलाय का की इतक्या वर्षात अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी (Rani Mukherjee) यांनी एकाही चित्रपटात एकत्र काम का केले नाही. काय आहे यामागचे कारण?
तर या सगळ्याला सुरुवात झाली 1996 सालापासून. त्यासाली 'खिलाडीयो के खिलाडी' हा अक्षयचा सिनेमा येणार होता. तेव्हा अक्षय नवोदित कलाकार होता. हा सिनेमाराणी मुखर्जीला ऑफर करण्यात आला होता. मात्र अक्षय कुमार नवीन कलाकार आहे हे बघून तिने नकार दिला. तेव्हा राणी मुखर्जी ही फिल्मी बॅकग्राऊंडमधून आली होती. तिने वडील राम मुखर्जी हे प्रसिद्ध दिग्दर्शक होते. तर आई कृष्णा मुखर्जी गायिका होती. तर दुसरीकडे अक्षय कुमार कोणतेही फिल्मी बॅकग्राऊंड नसताना आला होता.
'खिलाडीयो के खिलाडी' सिनेमात रवीना टंडनला घेण्यात आलं आणि सिनेमा तुफान हिटही झाला. यानंतर 1999 मध्ये आलेल्या 'संघर्ष' सिनेमातही राणी मुखर्जी आणि अक्षयची जोडी घ्यायची ठरली. मात्र राणीने पुन्हा अक्षयचे नाव ऐकताच सिनेमाला नकार दिला. आणि हा चित्रपट प्रिती झिंटाच्या पदरी पडला. या सिनेमात प्रितीचंही विशेष कौतुक झालं. यानंतर 2002 मध्ये आलेल्या 'आवारा पागल दीवाना' या सिनेमालाही राणीने नकार दिला. म्हणजेच एकूण ३ सिनेमांना तिने अक्षयचे नाव ऐकून काम करण्यास नकार दिला.
आता मात्र हीच परिस्थिती उलटी झाली आहे. अक्षयचे एकामागोमाग एक चित्रपट तुफान हिट झाले तर राणीचे अनेक सिनेमे फ्लॉप झाले. अशावेळी आदित्य चोप्राने मध्यस्थी करत अक्षयला राणीसोबत एक फिल्म ऑफर केली. मात्र आता अक्षयने राणीसोबत कधीच काम करणार नाही असे ठरवले. म्हणूनच अक्षय आणि राणी यांचा एकही सिनेमा आजपर्यंत आलेला नाही.