Lockdown : असं काय घडलं की अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना तातडीने पोहचले हॉस्पिटलला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 04:14 PM2020-03-29T16:14:16+5:302020-03-29T16:18:12+5:30

जाणून घ्या काय आहे कारण?

akshay kumar drives car in mumbai as twinkle khanna foot broken during coronavirus lockdown-ram | Lockdown : असं काय घडलं की अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना तातडीने पोहचले हॉस्पिटलला

Lockdown : असं काय घडलं की अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना तातडीने पोहचले हॉस्पिटलला

googlenewsNext
ठळक मुद्देबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या खूप चर्चेत आहे.

कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. अख्या देश ठप्प आहे. तातडीच्या कामाशिवाय कुणालाही घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाही. पण अशात आज अभिनेता अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्नासोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचला. कोरोनाने देशात थैमान घातले असताना अक्षय व ट्विंकल अचानक हॉस्पीटलमध्ये पोहोचल्याने सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला.
होय, अक्षय व ट्विंकलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ अक्षयची पत्नी ट्विंकलने स्वत:च तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात स्वत:च ड्रायव्हिंग करुन अक्षय तिला हॉस्पिटलमधून घेऊन येताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चर्चांना उधाण आले. 

अक्षय इतक्या तातडीने ट्विंकलला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याचे पाहून वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या.  ट्विंकलला कोरोना व्हायरसची लागण तर  झाली नाही ना, असा प्रश्नही काहींना पडला. पण असे काहीही नाहीये.  स्वत: ट्विंकलने या व्हिडीओमध्ये तसे स्पष्ट केले आहे.

काय म्हणाली ट्विंकल
 मी आणि अक्षय हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. पण मला कोरोना झालेला नाही. माझ्या पायाचे हाड मोडल्याने आम्हाला तातडीने हॉस्पिटलमध्ये जावे लागले़ सध्या मुंबईचे सर्व रस्ते जवळपास रिकामे आहेत. ड्रायव्हरला सुट्टी असल्याने आज अक्षयच माझा ड्रायव्हर आहे, असे ट्विंकलने व्हिडीओत स्पष्ट केले़ या व्हिडीओमध्ये ट्विंकलच्या पायाला प्लास्टर केलेले पाहायला मिळत आहे.

अक्षयने दिलेत 25 कोटी
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या खूप चर्चेत आहे. कोरोनाग्रस्तांसाठी 25 कोटी रुपये दान केल्याने त्याचे सर्वच स्तरातून अक्षय कुमारचे कौतुक होताना दिसत आहे. 
 

Web Title: akshay kumar drives car in mumbai as twinkle khanna foot broken during coronavirus lockdown-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.