केसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 04:48 AM2018-04-20T04:48:24+5:302018-04-20T10:19:46+5:30

अक्षय कुमार आपला आगामी चित्रपट 'केसरी'ची शूटिंग सध्या सातारातल्या वाईमध्ये करतो आहे. शूटिंग दरम्यान अक्षयला दुखापत झाल्याचे समजतेय. इंडिया ...

Akshay Kumar gets hurt in Kesari's set | केसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत

केसरीच्या सेटवर अक्षय कुमारला झाली दुखापत

googlenewsNext
्षय कुमार आपला आगामी चित्रपट 'केसरी'ची शूटिंग सध्या सातारातल्या वाईमध्ये करतो आहे. शूटिंग दरम्यान अक्षयला दुखापत झाल्याचे समजतेय. इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार अक्षय या चित्रपटाला क्लायमैक्सचा सीन शूट करत होता त्यावेळी त्याला दुखापत झाल्याचे कळतेय. अक्षयला डॉक्टरांनी मुंबईला परतण्याचा सल्ला दिला आहे. मात्र अक्षय मुंबईला परतला नाही तो वाईमध्येच थांबला आहे. सध्या चित्रपटाच्या क्लायमैक्सची शूटिंग थांबवली. 

ALSO READ :  अक्षय कुमारने पैशाने विकत घेतली स्वत:ची ‘स्टाईल’! विश्वास बसत नसेल तर वाचा ही बातमी!

या चित्रपटात अक्षय कुमार हवालदार ईश्वर सिंगची भूमिका साकारत आहे. सारगढी युद्धाची कहाणी शीख इतिहासात मोठ्या गर्वाने सांगितली जाते. हे युद्ध १८९७ मध्ये झाले होते. ब्रिटिश इंडियन आर्मीसाठी ३६ शीख रेजिमेंटने या युद्धात आपल्या साहसाची ओळख करून दिली होती. आपल्या २१ सैनिकांना घेऊन इश्वर सिंगने १० हजार सैन्याला दोन वेळा पराभूत केले होते. दुर्दैवाने तिसऱ्या वेळेस त्याचा पराभव झाला पण पूर्ण ब्रिटिश आर्मी येईपर्यंत त्यांनी १० हजार सैन्याला थोपवून ठेवले होते. केसरी हा चित्रपट शूरवीर इश्वर सिंगची गोष्ट सांगणार आहे. याच लढाईवर दिग्दर्शक राजकुमार संतोषी ‘बॅटल आॅफ सारागढी’ हा चित्रपट साकारत आहेत. यात त्याच्या अपोझिट  परिणीती चोप्रा दिसणार आहे. परिणीतीची अक्षयसोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.  या चित्रपटासाठी अक्षयने  तोफा चालवण्याचे आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच त्यांने पंजाबमधील प्रसिद्ध गटका या देसी मार्शल आर्टचे ट्रेनिंगदेखील घेतले. मेकर्सने या चित्रपटात कला प्रदर्शन करण्याचा विचार केला आहे. चित्रपटात आखाड्याचे सीन्स कमी आहेत मात्र जे आहेत ते रिअल दिसावेत म्हणून पंजाबच्या आखाड्यामधील खऱ्या कुस्तीपटूंना घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

Web Title: Akshay Kumar gets hurt in Kesari's set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.