प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक तरीही कमाई कमीच! 'केसरी २'चा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 11:51 IST2025-04-19T11:49:55+5:302025-04-19T11:51:12+5:30
'केसरी २' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली. जाणून घ्या (kesari 2)

प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक तरीही कमाई कमीच! 'केसरी २'चा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर
अक्षय कुमार (akshay kumar) आणि आर. माधवन (r madhvan) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'केसरी २' (kesari 2) या सिनेमाने १८ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. अक्षय कुमारचा आजवरचा वेगळा सिनेमा म्हणून 'केसरी २' सिनेमाकडे पाहिलं जातंय.जालिनयवाला बाग हत्याकांडावर हा सिनेमा आधारीत आहे. 'केसरी २' सिनेमा पहिल्या दिवशी किती कमाई करतो, याकडे सर्वांचं लक्ष होतं. जाणून घ्या 'केसरी २' सिनेमाचा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट
'केसरी २' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली
'केसरी २' सिनेमाने पहिल्या दिवशी भारतात सुमारे ७.५ कोटींची कमाई केली आहे.सिनेमाला समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे आगामी दिवसांत कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सिनेमाने पहिल्या दिवशी सुमारे ४९,००० तिकिटांची विक्री केली आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'केसरी' या सिनेमाने पहिल्या दिवशी ₹२१ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे 'केसरी २' च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची सुरुवात काहीशी संथ म्हणाली लागेल. आगामी वीकेंडमध्ये 'केसरी २'च्या कमाईत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
'केसरी २' सिनेमाविषयी
'केसरी २' मध्ये अक्षय कुमार आणि माधवन वकिलाच्या भूमिकेत आहेत. अक्षय सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारत आहे जे प्रसिद्ध वकील आणि काँग्रेसचे नेते होते. त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडामागचं तथ्य समोर आणलं होतं आणि ब्रिटीश सरकारविरोधात कोर्टात हिंमतीने लढाई लढली होती. तर माधवन ब्रिटिशांच्या बाजूने लढणारे वकील नेविल मॅककिनले यांची भूमिका साकारत आहे. अनन्या पांडे युवा वकील दिलरीत गिलच्या भूमिकेत आहे.