Samrat Prithviraj Movie Tax Free: 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट उत्तर प्रदेश पाठोपाठ आणखी दोन राज्यात टॅक्स फ्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 07:54 PM2022-06-02T19:54:08+5:302022-06-02T19:55:32+5:30
उद्या सर्वत्र रिलीज होणार सम्राट पृथ्वीराज
Samrat Prithviraj Movie Tax Free: बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार (akshay kumar) याचा 'सम्राट पृथ्वीराज' (samrat prithviraj) हा चित्रपट विविध अडचणींचा सामना करत अखेर प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. नावाच्या वादापासून या चित्रपटाने अनेक संकटे पार केली. त्यानंतर आता सिनेमा रिलिज होण्याआधी त्यांनी 'गुड न्यूज' मिळाल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशात सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला होता. त्यानंतर आता मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (cm yogi adityanath) यांनी गुरूवारी दुपारी या चित्रपटाला टॅक्स फ्री केल्याची घोषणा केली. त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही आपल्या ट्वीटरवरून ट्वीट करत हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री केल्याचे घोषित केले. या दोन चांगल्या बातम्या मिळाल्या असतानाच, उत्तराखंडमध्येही हा सिनेमा टॅक्स फ्री केल्याची घोषणा करण्यात आली. उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी यांनी 'एएनआय'शी बोलताना राज्यात चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan declares film #SamratPrithviraj tax-free in the state. pic.twitter.com/us9mZWRZWM
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) June 2, 2022
--
We've decided to make the film Samrat Prithviraj tax-free in the state: Uttarakhand CM Pushkar Singh Dhami pic.twitter.com/Yho4wZz0k1
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 2, 2022
दरम्यान, गुरुवारी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळातील काही नेत्यांसह 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट पाहिला. या स्पेशल स्क्रिनिंगच्यावेळी चित्रपट दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, अक्षय कुमार, मानुषी छिल्लर उपस्थित होते. यावेळी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यासोबतच त्यांनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला. सम्राट पृथ्वीराजपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी काश्मीर फाईल्स हा चित्रपटदेखील राज्यात टॅक्स फ्री केला होता. तशातच आता सम्राट पृथ्वीराज चित्रपट तीन राज्यात टॅक्स फ्री झाला असल्याने सिनेमाचे मेकर्स खूप आनंदी असल्याचे दिसत आहे.