"किसी के बाप मे दम नहीं..." अक्षय कुमारने सांगितला 'पॅडमॅन' चा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 09:20 AM2023-10-08T09:20:17+5:302023-10-08T09:21:40+5:30
माझ्या बाजूच्या माणसालाही हातात पॅड दिलं. तर त्याचा PA मला....
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'मिशन रानीगंज' सिनेमामुळे चर्चेत आहे. अक्षयचे मागील अनेक चित्रपट एकामागोमाग एक फ्लॉप झाले. त्यामुळे या सिनेमाकडून त्याला आणि चाहत्यांना अपेक्षा आहेत. अक्षयचा नुकताच रिलीज झालेला 'OMG 2' सिनेमा हिट झाला मात्र 'ए' सर्टिफिकेटमुळे सिनेमाला जास्त कमाई करता आली नाही. हा सिनेमा आता ओटीटीवर येत आहे. यामध्येही कट एडिटेड सिनेमाच दाखवला जाणार आहे. दरम्यान अशाच काही विषयांवर अक्षयने एका इव्हेंटमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
'ओएमजी 2'च्या ओटीटी व्हर्जनबाबत अक्षय म्हणाला,"नियम तर नियम आहेत. सीबीएफसीला वाटले की ती एक अडल्ट फिल्म आहे. तुम्हालाही असंच वाटतं का? ती एक अशी फिल्म आहे जी तरुणांना दाखवली पाहिजे. मी त्यांच्यासाठीच बनवली होती पण त्यांनाच पाहता आली नाही. बरंय नेटफ्लिक्सवर फिल्म रिलीज होत आहे. या विषयाबद्दल लोकांनी जागरुक असणं गरजेचं आहे."
तो पुढे म्हणाला,"जेव्हा मी टॉयलेट एक प्रेमकथा बनवली होती तेव्हाही लोक मला म्हणाले हे काय नाव आहे का. शौचालयवर सिनेमा बनवतोय? मी कोणाचंच ऐकलं नाही. मी पुढाकार घेत सिनेमा बनवला. सिनेमा किती कमाई करेल यावर विचार करायला लावून मला निराश करु नका. मला बळ द्या. प्रेक्षक अशा विषयांबाबतीत जागरुक असले पाहिजे यासाठी मी यावर सिनेमा बनवतो. समाजात बदल घडवण्याची वेळ आली आहे."
"मी पॅडमॅन सिनेमा केला. कोणाच्या बापात एवढी हिंमत नव्हती की सॅनिटरी पॅडवर सिनेमा करावा. कोणी पॅड्सना हातही लावायचं नाही. मी नाव घेणार नाही पण मी एकासोबत उभा होतो. आमच्या सगळ्यांच्या हातात पॅड होते. माझ्या बाजूच्या माणसालाही हातात पॅड दिलं. तर त्याचा PA मला कानात म्हणतो सर, त्यांना पॅड देऊ नका. चांगलं दिसत नाही." असाही किस्सा अक्षयने यावेळी सांगितला.
अक्षयच्या 'मिशन रानीगंज' सिनेमाने पहिल्याच दिवशी 2.85 कोटी रुपये कमावले. जी की जबरदस्त ओपनिंग आहे. टिनू सुरेश देसाई यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे.