Amazon Prime Video ची भारतीय चित्रपट निर्मिती क्षेत्रात उडी; प्रोड्युस करणार अक्षय कुमारचा चित्रपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 07:32 PM2021-03-18T19:32:48+5:302021-03-18T19:35:01+5:30
Amazon Prime Video पहिल्यांदा आपला बॉलिवूड चित्रपट प्रोड्युस करणार आहे.
अभिनेता अक्षय कुमार हा आगामी राम सेतू या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं ८० टक्के चित्रिकरण हे मुंबईतच होणार आहे. दरम्यान हा चित्रपट काल आणि उद्या या तीन पिढ्यांमध्ये सेतू म्हणून काम करण्यार आहे. या चित्रपटात विश्वास, विज्ञान आणि ऐतिहासिक वारसा तसेच भारतीयांच्या श्रद्धाची कथा दाखवण्यात येणार आहे. यात अक्षय कुमार प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा रामायण आणि भगवान राम यांच्या आदर्शांवर आधारित असणार आहे. दरम्यान, Amazon.com च्या Prime Video चा हा पहिला प्रोड्युस केलेला बॉलिवूड चित्रपट असेल.
Amazon भारतात वेगानं वाढणाऱ्या व्हिडीओ मार्केटपैकी एक आहे. Amazon Prime Video आणि आणखी दोन स्टुडिओज मिळून राम सेतू या चित्रपटाची निर्मिती करत असल्याचं रॉयटर्सन कंपनीच्या हवाल्यानं म्हटलं आहे. दरम्यान, हा चित्रपच केव्हा प्रदर्शित होईल याबाबत माहिती देण्यात आली नाही. हा चित्रपट प्रोड्युस करण्याचा निर्णय घेऊन आम्हाला आनंद झाला आहे. हा चित्रपट आपली संस्कृती दाखवतो, अशी प्रतिक्रिया Amazon Prime Video India चे कंटेन्ट बेड विजय सुब्रह्मण्यम यांनी दिली.
‘बच्चन पांडे’चे शूटिंग संपल्यानंतर अक्षय कुमार सध्या आपल्या कुटुंबासमवेत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेला होता. या व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता तो या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात करणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करणार आहे. या चित्रपटासाठी दीर्घ काळापासून अभिनेत्रींचा शोध सुरू होता. आता जॅकलिन आणि नुसरत यांची नावं निश्चित करण्यात आली आहे.