अक्षय कुमार का म्हणतोय....बावरा मन

By Admin | Published: January 11, 2017 05:57 PM2017-01-11T17:57:36+5:302017-01-11T17:57:36+5:30

0 फेब्रुवारी रोजी अक्षय कुमारचा जॉली एलएलबी-2 हा चित्रपटगृहात झळकणार आहे. या चित्रपटातील दुसरे गाणं बावरा मन आज रिलीज करण्यात आलं आहे.

Akshay Kumar's voice .... Bawra Mana | अक्षय कुमार का म्हणतोय....बावरा मन

अक्षय कुमार का म्हणतोय....बावरा मन

googlenewsNext
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - 10 फेब्रुवारी रोजी अक्षय कुमारचा जॉली एलएलबी-2 हा चित्रपटगृहात झळकणार आहे. या चित्रपटातील दुसरे गाणं बावरा मन आज रिलीज करण्यात आलं आहे. अक्षय कुमारने आपल्या ट्विटरवर या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अक्षयच्या पोस्टनंतर  #BawaraMann हा हॅशटॅग तयार झाला आहे. या गाण्यात हुमा आणि अक्षय यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
 
बावरा मन हे गाण जुबिन नौतियाल आणि नीती मोहन यांनी गायलं आहे. या चित्रपटात अक्षय वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच हुमा कुरेशी आणि अनु कपूर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 
 
जॉली एलएलबी 2013 मधील चित्रपटाचा हा सिक्वेल असून सुभाष कपूर यांनी चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. जॉली त्याची सर्वात मोठी केस लढण्यासाठी आला आहे अशा कॅप्शनसह अक्षयने सिनेमाचा ट्रेलर आणि पोस्टर डिसेंबरच्या अखेरीस रिलीज केलं होतं.
 

Web Title: Akshay Kumar's voice .... Bawra Mana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.