"तू इतकी जाडी कशी?" म्हणणाऱ्या ट्रोलरला अक्षया नाईकचं सडेतोड उत्तर, थेट मुंबई पोलिसांना केलं टॅग, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 04:25 PM2024-09-30T16:25:09+5:302024-09-30T16:26:52+5:30

अर्वाच्य भाषेत ट्रोल करणाऱ्या एका नेटकऱ्याला अक्षयाचं चोख उत्तर, म्हणाली- "मी भाग्यवान आहे की..."

akshaya naik reply to troller who is body shaming her ask fans to banned his account | "तू इतकी जाडी कशी?" म्हणणाऱ्या ट्रोलरला अक्षया नाईकचं सडेतोड उत्तर, थेट मुंबई पोलिसांना केलं टॅग, म्हणाली...

"तू इतकी जाडी कशी?" म्हणणाऱ्या ट्रोलरला अक्षया नाईकचं सडेतोड उत्तर, थेट मुंबई पोलिसांना केलं टॅग, म्हणाली...

अक्षया नाईक हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा आहे. मराठीबरोबरच तिने हिंदी टेलिव्हिजनचा पडदादेखील गाजवला आहे. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. झिरो फिगर आणि सुडौल व्यक्तिमत्त्व ही हिरोईनची इमेज ब्रेक करणाऱ्या काही मोजक्या अभिनेंत्रीपैकी अक्षया ही एक आहे. यामुळे तिला ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं आहे. पण, अर्वाच्य भाषेत ट्रोल करणाऱ्या एका नेटकऱ्याला अक्षयाने चांगलाच इंगा दाखवला आहे. 

अक्षयाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने ट्रोल करणाऱ्याला धडा शिकवला आहे. अक्षयाने काही स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. त्याबरोबरच तिने या स्टोरीमध्ये मुंबई पोलिसांना टॅग करून हे अकाऊंट ब्लॉक करण्याची मागणीही केली आहे. 

अक्षया नाईकची पोस्ट 

मी खूप भाग्यवान आहे की मी सोशल मीडियावर बॉडी शेमिंग/ ट्रोलिंगचा सामना केला नाही. कधीतरी, होय नक्कीच; पण मी अनेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यांना इतकं महत्त्व द्यावं असं कधी वाटलं नव्हतं. पण, यावेळी मला त्या व्यक्तीला बोलावंसं वाटतं कारण टिप्पण्या/ बॉडी शेमिंगमध्ये माझ्या कुटुंबातील सदस्यांचाही उल्लेख आहे. आणि हे मी सहन करू शकत नाही. 

 

तसेच, ही व्यक्ती इतकी रिकामटेकडी आहे की ते २०१९ मध्ये अपलोड केलेल्या पोस्ट खोदून कमेंट करत आहेत. आणि त्या अकाऊंटवर त्यांचे कोणतेही फॉलोवर्स किंवा पोस्ट नाहीत. हे Hate अकाऊंट खास माझ्यासाठी बनवले आहे असे दिसते. 

बरं हे त्यांचे अकाऊंट आहे. जमल्यास Report, Spam/ Report Block करा. 

अक्षयाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या हिंदी मालिकेतही ती झळकली होती. 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतील तिची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेने तिला एक वेगळी ओळख मिळवून दिली. 
 

Web Title: akshaya naik reply to troller who is body shaming her ask fans to banned his account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.