Alia Bhat : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! लेकीच्या जन्मानंतर आलियाच दिसतेय छोटी मुलगी, नेटकरी म्हणतात, 'संतूर मॉम'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 11:19 AM2023-02-20T11:19:11+5:302023-02-20T11:19:38+5:30
चेहऱ्यावरही कमालीचा ग्लो आणि अतिशय फिट अॅंड फाईन असलेल्या 'संतूर मॉम' आलिया भटचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
Alia Bhat : अभिनेत्री आलिया भट फिटनेसबाबत नेहमीच जागरुक असल्याचं दिसलं आहे. ती नेहमीच तिचे योगा, जिमचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. विशेष म्हणजे आलिया नुकतीच आई झाली आहे. तरी तिचा पोस्ट प्रेग्नंसी फिटनेस बघितला तर चकित व्हायला होईल. ही लगेच एवढी कशी फिट झाली असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडला आहे.
आलिया भटने ६ नोव्हेंबर रोजी मुलीला जन्म दिला. तिचे नाव 'राहा' असे ठेवण्यात आले. लेकीच्या जन्मानंतर काही दिवसातच आलिया तिच्या फिटनेसकडे वळली. तिचे नियमित योगा सेंटरला जातानाचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हयरल होत असतात.
सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी यांनी नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ब्लॅक रंगाचे जॅकेट आणि ब्लॅक रंगीचीच जेगिंग, केसांची पोनी अशा लुकमध्ये आलिया योगासाठी पोहोचली. यावेळी तिचा फिटनेस बघून आश्चर्यच वाटले. इतकंच नाही तर तिच्या चेहऱ्यावरही कमालीचा ग्लो दिसत आहे. आलिया पुन्हा एखाद्या लहान मुलीसारखीच या व्हिडिओत दिसत आहे.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत.'यार ही पुन्हा बारिक झाली' अशी कमेंट एकाने केली आहे. तर आणखी एका युझरने म्हटलेस, 'आई झाल्यानंतर ही पुन्हा लहान मुलगी बनली आहे.' तर दुसऱ्याने लिहिले,'आलिया स्वत:च एक बेबी दिसत आहे, आई वाटतच नाही.'
Alia Bhatt : आलियाने शेअर केले चिमुकल्या बाळाचे फोटो, चाहते म्हणाले, 'ही तर बेबी राहा...'
आलियाच्या या पोस्ट प्रेग्नंसी ट्रान्सफॉर्मेशनवर नेटकरी घायाळ झालेत. आई झाल्यानंतर काहीच दिवसात आलिया फारच सक्रिय झाली आहे. ती फिटनेसकडे लक्ष देत आहे सोबतच सार्वजनिक कार्यक्रमांसाठीही हजेरी लावत आहे. लवकरच ती आगामी सिनेमांचे शूटही सुरु करेल अशी शक्यता आहे. आलिया आणि रणवीर सिंगचा (Ranveer Singh) आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट याचवर्षी प्रदर्शित होणार आहे. करण जोहरने सिनेमा दिग्दर्शित केला आहे.