Met Gala 2023 : सौंदर्याला मोत्यांचा साज! आलियाच्या 'मेट गाला' तील लुकवर भाळले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 10:09 AM2023-05-02T10:09:51+5:302023-05-02T10:11:01+5:30

'गंगुबाई काठियावाडी' सिनेमाच्या यशानंतर आलिया भटचं नशीबच चमकलं आहे.

alia bhat met gala look actress spotted in white gown made with pearls | Met Gala 2023 : सौंदर्याला मोत्यांचा साज! आलियाच्या 'मेट गाला' तील लुकवर भाळले नेटकरी

Met Gala 2023 : सौंदर्याला मोत्यांचा साज! आलियाच्या 'मेट गाला' तील लुकवर भाळले नेटकरी

googlenewsNext

मेट गाला 2023 (Met Gala 2023) या प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटला न्यूयॉर्कमध्ये सुरुवात झाली आहे. या इव्हेंटमध्ये अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhat) डेब्यू केला आहे. इव्हेंटमध्ये आलिया व्हाईट गाऊनमध्ये जणू परीच दिसत होती.सोबतच तिने सिल्व्हर आणि व्हाईट ज्वेलरी घालून लुक पूर्ण केला. आलियाचा हा लूक आतापर्यंतचा नक्कीच खास लुक्सपैकी एक होता.

'गंगुबाई काठियावाडी' सिनेमाच्या यशानंतर आलिया भटचं नशीबच चमकलं आहे. 'हार्ट ऑफ गोल्ड' या सिनेमातून तिने हॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. तर आता पहिल्यांदाच ती मेट गालामध्येही दाखल झाली आहे. इथेही आलियाने तिची चमक दाखवली आहे. इव्हेंटच्या सुरुवातीला आलियाने तिचा एक शॅडो फोटो पोस्ट केला होता. हे बघून चाहत्यांनी तिच्या लुकची उत्सुकता होती.

यानंतर आलियाने व्हाईट कार्पेटवर एंट्री केलेला फोटो पोस्ट केला. डिझायनर प्रबल गुरुंग यांनी मोत्यांनी व्हाईट गाऊन बनवला होता. १ लाख अस्सल मोत्यांनी हा गाऊन खास आलियाच्या डेब्यूसाठी साकार करण्यात आला होता. त्यावर आलियाने तितकीच अस्सल ज्वेलरी परिधान केली होती. तर तिच्या सुंदर हेअरक्लिपनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हा तिचा शनेल ब्राईड लुक असल्याचं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं.  आलियाने अतिशय आत्मविश्वासाने गाऊन कॅरी केला. आलियाने हे फोटो शेअर करताच कमेंट्सचा वर्षाव झाला.

आलियाची बहीण शाहीन भटने 'एंजल' असे संबोधले. आलियाच्या 'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलिवूड डेब्यूपूर्वीच तिचा मेट गाला मध्ये डेब्यू झाला. टॉम हार्पर दिग्दर्शित 'हार्ट ऑफ स्टोन' हा टॉम क्रूझच्या 'मिशन इम्पॉसिबल' सिरीज सारखाच असणार आहे. यामध्ये गॅल गॅडोट आणि जेमी मुख्य भूमिकेत आहेत.

मेट गाला सर्वात मोठ्या फॅशन नाईट्सपैकी एक आहे. सध्या हा इव्हेंट न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा कॉस्च्यूम इंन्स्टिट्यूट एग्झिबिशन असून यंदाची थीम "कार्ल लेहेरफेल्ड : अ लाइन ऑफ ब्यूटी" अशी आहे.

Web Title: alia bhat met gala look actress spotted in white gown made with pearls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.