आलिया-रणबीर अडकणार लग्नबंधनात, हा फोटो देतोय त्याचे संकेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 05:11 PM2019-09-03T17:11:52+5:302019-09-03T17:15:27+5:30
आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून इंडस्ट्रीत रंगली आहे.
आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून इंडस्ट्रीत रंगली आहे. मुकेश अंबानींच्या घरी गणपतीला दोघे एकत्र स्पॉट झाले. दोघे एकत्र खूपच सुंदर दिसत होते. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार सध्या या जोडीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात रणबीर आणि आलियाच्या लग्नाचा फोटो दिसतोय. आलिया आणि रणबीरने एकमेकांच्या गळ्यात हार घालताना दिसतेय. असे गोंधळून जाऊ नका.
कारण आलियाने नुकतेच एक अॅड शूट केले आहे. एक प्रसिद्ध ब्राँडसाठी आलिया वधूच्या गेटमध्ये तयार झाली. आलिया आणि रणबीरटचे हे फोटो शूट एडिट करण्यात आले आहे. मॉडलच्या ठिकाणी रणबीरचा चेहरा लावण्यात आला. सध्या आलिया आणि रणबीरचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतायेत.
आलियाच्या खऱ्या आलियाने लग्नासाठी लेहंग्याची ऑर्डर दिली. याच महिन्यात ऋषी कपूर न्यूयॉर्कवरुन मुंबईत परतणार आहेत. त्यानंतर आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख फायनल करण्यात येईल.
वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले ते, ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या निमित्ताने रणबीर व आलिया भट्ट पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. (‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर आलियासह, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात एक सुपरहिरोची कथा पाहायला मिळणार आहे.