व्हायरल होत आहेत या क्यूट कपलचे फोटो, येथे घेत आहेत सुट्टीचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 01:19 PM2019-09-06T13:19:24+5:302019-09-06T13:19:59+5:30

आपल्या बिझी शेड्यूलमधून एकमेकांसोबत वेळ घालवण्याची एकही संधी हे कपल गमावत नाहीत.

alia bhatt and ranbir kapoor vacation in kenya | व्हायरल होत आहेत या क्यूट कपलचे फोटो, येथे घेत आहेत सुट्टीचा आनंद

व्हायरल होत आहेत या क्यूट कपलचे फोटो, येथे घेत आहेत सुट्टीचा आनंद

googlenewsNext
ठळक मुद्दे रणबीरचे आई-वडिल ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांनी या लग्नाला संमती दिली आहे. तिकडे आलियाचे कुटुंबही ‘राजी’ आहे. 

रणबीर कपूर आणि आलिया भट हे बॉलिवूडचे लव्हबर्ड्स सध्या कुठे आहेत? तर दूर केनियात. होय,  आपल्या बिझी शेड्यूलमधून एकमेकांसोबत वेळ घालवण्याची एकही संधी हे कपल गमावत नाहीत. सध्या आलिया-रणबीर केनियामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत.
आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला आहे. हा फोटो आहे सूर्योदयचा. फोटो अपलोड करताना आलियाने केनिया किंवा रणबीरचा उल्लेख केलेला नाही. पण यानंतर असे काही फोटोही समोर आलेत की, त्यावरून रणबीर व आलिया एकत्र हॉलीडे एन्जॉय करत असल्याचे स्पष्ट झाले.


 व्हायरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो अपलोड केला आहे, यात रणबीर आणि आलिया एकत्र जंगल सफारी करताना दिसत आहेत.  एका खुल्या जीपमधून हे कपल जंगल सफारी करत आहे आणि आलियाच्या हातात एक कॅमेरा आहे. हा फोटो केनियातील व्हायरल भयानीच्या फॉलोअर रबिका हमीदाने पाठविला आहे. 


नुकतेच मुकेश अंबानी यांच्या घरच्या गणेश स्थापनेवेळी रणबीर कपूर आणि आलिया भट दिसले होते. दोघांनीही या सोहळ्यात एकत्र एन्ट्री घेतली होती. यादरम्यानची त्यांची केमिस्ट्री चांगलीच चर्चेत आली होती. आलिया व रणबीर हे दोघे गत वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत. याकाळात दोघेही अनेकदा एकत्र दिसले.

दोघे लवकरच लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे. रणबीरचे आई-वडिल ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांनी या लग्नाला संमती दिली आहे. तिकडे आलियाचे कुटुंबही ‘राजी’ आहे. 
आलियाच्या आधी रणबीर कतरीना कैफ आणि दीपिका पादुकोणसोबत रिलेशनशिपमध्ये होता. तर आलिया व सिद्धार्थ मल्होत्राच्या अफेअरचीही चर्चा होती.

Web Title: alia bhatt and ranbir kapoor vacation in kenya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.