Alia Bhatt Delivery: आज मिळणार गोड बातमी...? आलिया भट रूग्णालयात दाखल, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 10:42 AM2022-11-06T10:42:19+5:302022-11-06T10:42:43+5:30

Alia Bhatt Delivery: लवकरच आलिया व रणबीरच्या चाहत्यांना  गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. आलियाला रिलायन्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. 

alia bhatt baby expected soon as ranbir kapoor reaches hospital | Alia Bhatt Delivery: आज मिळणार गोड बातमी...? आलिया भट रूग्णालयात दाखल, व्हिडीओ व्हायरल

Alia Bhatt Delivery: आज मिळणार गोड बातमी...? आलिया भट रूग्णालयात दाखल, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

कपूर कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. कारण लवकरच कपूर घराण्यात नवा गोड पाहुणा येणार आहे. आलिया भट (Alia Bhatt ) व रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लवकरच आई बाबा बनणार आहेत. लवकरच आलिया व रणबीरच्या चाहत्यांना  गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. नुकतंच आलियाला रिलायन्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. 
मीडिया रिपोर्ट्सनुसार आलियाला सकाळी 7 च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.  याच रूग्णालयात आलिया आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. आलिया व रणबीरला आज सकाळी रूग्णालयात पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कपूर घराण्यातील सर्व सदस्य तान्हुल्या पाहुण्याच्या आगमनाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

सध्या सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आज सकाळी रणबीर-आलिया मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलबाहेर दिसले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे जोडपं त्यांच्या पहिल्या मुलाच्या प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचलं आहे. सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आलिया आणि रणबीरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आलिया आणि रणबीर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल होताना दिसून येत आहेत. 

आलिया व रणबीरने याचवर्षी एप्रिल महिन्यात लग्न केलं. अगदी मोजक्या कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाची जोरदार चर्चा झाली. लग्नानंतर उण्यापुºया दोनच महिल्यात या जोडप्यानं गुडन्यूज शेअर केली होती. जूनमध्ये आलियाने सोनोग्राफी रुममधून एक फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. आलिया आणि रणबीर आपल्या पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी प्रचंड उत्सुक आहेत. 
 सध्या ही बातमी जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत.

Web Title: alia bhatt baby expected soon as ranbir kapoor reaches hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.