Alia Bhatt VIDEO : प्रेग्नंट आलिया भटनं फ्लॉन्ट केला बेबी बम्प, विमानतळावर मिळालं गोड सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 02:21 PM2022-07-10T14:21:16+5:302022-07-10T14:24:15+5:30

Alia Bhatt Baby bump : हॉलिवूड सिनेमाचं शूटींग आटोपलं आणि आलिया शनिवारी रात्री मुंंबईत आली. मुंबई एअरपोर्टवर तिला खूप मोठ्ठ सरप्राईज मिळालं.

Alia Bhatt flaunts her baby bump at airport shout baby at Ranbir Kapoor | Alia Bhatt VIDEO : प्रेग्नंट आलिया भटनं फ्लॉन्ट केला बेबी बम्प, विमानतळावर मिळालं गोड सरप्राईज

Alia Bhatt VIDEO : प्रेग्नंट आलिया भटनं फ्लॉन्ट केला बेबी बम्प, विमानतळावर मिळालं गोड सरप्राईज

googlenewsNext

Alia Bhatt Baby bump : अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt ) लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच आलियाने आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. गेल्या काही दिवसांपासून आलिया रणबीर कपूरपासून ( Ranbir Kapoor ) दूर युरोपमध्ये होती. युरोपमध्ये तिच्या ‘House of Stones ’ या हॉलिवूड सिनेमाचं शूटींग सुरू होतं. हे शूटींग आटोपलं आणि आलिया शनिवारी रात्री मुंंबईत आली. मुंबई एअरपोर्टवर तिला खूप मोठ्ठ सरप्राईज मिळालं. होय, आलियाला पिक अप करायला खुद्द रणबीर आला होता. त्याला पाहून आलियाचा आनंद गगनात मावेनासा झाला. बेबी म्हणत ती त्याच्याकडे धावली, मग काय घडलं? यासाठी तुम्हाला बातमीसोबतचा व्हिडीओ पाहावा लागेल.

प्रेग्नंट आलिया भट मुंबई एअरपोर्टवर उतरताच पापाराझींनी तिला घेरलं. सगळेजण तिला आई होणार असल्यामुळे शुभेच्छा देत होते. आलियाने शुभेच्छा देणाºया सर्वांचे हात जोडून आभार मानले आणि आलिया तिच्या कारकडे निघाली. रणबीर आपल्याला घ्यायला आला आहे, हे तोपर्यंत तिला माहित नव्हतं. पण कारजवळ पोहोचताच तिला रणबीर दिसला आणि तो दिसताच बेबी असं म्हणत ती त्याचाकडे धावली. गाडीत दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. आलियाने रणबीरला किती मिस केलं, हे हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल.

आलिया लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.  आलिया भट्टनं तिच्या पहिल्या वहिल्या हॉलिवूड चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.  या चित्रपटाचं शूटींग पूर्ण होताच तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. ‘आता मी घरी येत आहे बेबी....’, असं तिने रणबीरला उद्देशून लिहिलं होतं.  


  
फ्लॉन्ट केला  बेबी बम्प
आलिया गरोदर आहे. शनिवारी विमानतळावर तिचा बेबी बम्प स्पष्ट दिसला. विशेष म्हणजे, तिचा बेबी बम्प पाहून आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. आलियाच्या लग्नाला उणेपुरे तीन महिने पूर्ण होत आहे आणि अशात एवढा मोठा बेबी बंप पाहून लग्नापूर्वीच ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा सर्वजण करत आहेत.

  

Web Title: Alia Bhatt flaunts her baby bump at airport shout baby at Ranbir Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.