आलिया भटजवळ आहे सर्वाधिक पुरस्कार, तर रणबीर कपूर आहे कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 06:46 PM2022-04-15T18:46:04+5:302022-04-15T18:46:43+5:30
आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) १४ एप्रिलला लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) १४ एप्रिलला लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. आलिया भट आणिरणबीर कपूर हे दोघेही बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार आहेत. रणबीरने २००७ मध्ये सांवरिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज तो सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार आहे. आलिया भटने २०१२ मध्ये स्टुडंट ऑफ द ईयर चित्रपटातून एन्ट्री घेतली. तीही भरभक्कम रक्कम मानधन म्हणून घेते. आलियाला आतापर्यंत २४ पुरस्कार मिळालेले आहेत, त्यातील १४ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे आहेत.
रणबीर कपूरचा पहिला चित्रपट सांवरिया (२००७) असून या चित्रपटाचा बजेट ३१ कोटी होता आणि या चित्रपटाने ३८ कोटी कमाई केली. तर आलिया भटने स्टुडंट ऑफ द ईयर (२०१२)मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाचे बजेट ५९ कोटी होते आणि या चित्रपटाने १०९ कोटींची कमाई केली. रणबीर कपूरचे राजनीती, ये जवानी है दिवानी, रॉकस्टार, बर्फी, ए दिल हैं मुश्किल, संजू हे गाजलेले चित्रपट आहेत. तर आलियाचे टू स्टेट, कपूर ॲन्ड सन्स, राझी, गली बॉय, गंगूबाई काठियावाडी हे चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. रणबीरने एकूण १७ चित्रपटात काम केले आहे. तर आलियाने १५ सिनेमात काम केले आहे.
रणबीर कपूरकडे एकूण संपत्ती ३५० कोटी इतकी आहे. तर आलियाकडे एकूण संपत्ती १५० कोटी आहे. रणबीर कपूरचे मानधन १८ ते २० कोटी आहे तर आलियाचे मानधन २० कोटी इतके आहे. रणबीर कपूर ओरिया, लिनोव्हो, पेप्सी, कोका कोला, लेज, एशियन पेंटस, रेनॉल्ट, पॅनासॉनिक, फ्लिपकार्ट माएस्ट्रो याचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे. तर आलिया पर्क, मॅबलीन मान्यवर, फ्लिपकार्ट, फ्रूटी, मेक माय ट्रीप, फिलिपची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे.
रणबीर कपूरला १७ पुरस्कार मिळाले आहेत तर आलिया भटला १४ पुरस्कार मिळाले आहेत. रणबीर कपूरचे शमशेरा, ब्रम्हास्त्र,लव रंजनचा एक चित्रपट, ॲनिमल हे आगामी प्रोजेक्ट्स आहेत. तर आलियाचे ब्रम्हास्त्र, डार्लिंग्ज, रॉकी और रानी की प्रेम कहानी, जी ले जरा हे आगामी चित्रपट आहेत.